
दोडामार्ग : " मोदी @ ९ " कार्यक्रमा अंतर्गत दोडामार्ग भेडशी येथुन भाजपा च्या वतीने " घर घर संपर्क " अभियानाचा शुभारंभ जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी साटेली भेडशी येथे करण्यात आला.
दोडामार्ग भारतीय जनता पार्टीची मासिक सभा शनिवारी साटेली भेडशी येथील वनविभाग विश्राम गृहावर जिल्हा अध्यक्ष राजन तेली यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी त्यांच्या समवेत जिल्हा उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी, राजन म्हापसेकर,मंडल अध्यक्ष सुधीर दळवी, चंद्रशेखर देसाई, रमेश दळवी,शंकर देसाई, सरपंच सुरेंद्र सावंत, मिडिया संयोजक शिरीष नाईक, संजय विरनोडकर, विजय ठाकुर, हरिश्चंद्र नाईक, अजय परब,सुदन ,चोरलेकर ,किशोर मयेकर, सुर्या धरणे, मणेरिकर, प्रितम पोकळे, विष्णू ठाकर आदी भाजपचे बुध अध्यक्ष व शक्ती केंद प्रमुख व कार्यकर्ते उपस्थित होते.
जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी उपस्थतांना मार्गदर्शन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत योजना पोहचवुन गरीब जनतेला विकासाच्या दिशेने घेऊन जाण्याचे कार्य करत आहेत. म्हणूनच मागील ९ वर्षात देश आर्थिक, संरक्षण, आरोग्य, रोजगार, तंत्रज्ञान या क्षेत्रात देश आघाडीवर आहे .
त्यामुळे मागील ९ वर्षातील पंतप्रधान मोदींच्या कामांचा प्रचार प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचावा यासाठी हे " घर घर अभियान " असल्याचे त्यांनी सांगितले. या अभियानाच्या माध्यमातून सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात ६० हजार लोकांपर्यंत मोदींचे कार्य पोहचवुन ९०९०९०२०२४ या क्रमांकावर मिसकाॅल देऊन मोदींना समर्थन द्यावे असे आवाहन यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना केले आहे.