आदित्य एल -1चं प्रक्षेपण ; नॅशनल इंग्लिश मिडीयम स्कूल नडगिवेच्या विद्यार्थ्यांनी घेतला अनुभव

Edited by: उमेश बुचडे
Published on: September 02, 2023 16:30 PM
views 139  views

कणकवली : आदर्श एज्युकेशन सोसायटी संचलित नॅशनल इंग्लिश मिडीयम स्कूल नडगिवे तील विद्यार्थ्यांनी भारताच्या पहिल्या वहिल्या सूर्य मोहीम आदित्य एल 1  च्या प्रक्षेपणाचा अनुभव घेतला. विद्यार्थी या ऐतिहासिक घटनेचे साक्षीदार व्हावेत म्हणून विद्यार्थ्यांना शाळेत मोठया टीव्ही स्क्रीन वर हे प्रक्षेपण लाईव्ह दाखवण्यात आले.

तसेच या विषयी अधिक माहिती देणारे व्हिडिओ दाखवण्यात आले. विद्यार्थ्यांनी हा भारतासाठी असलेला गौरव क्षण आनंदाने साजरा केला.विद्यार्थ्यांनी भारत माता की जय! वंदे मातरम्! या सारख्या घोषणा देवून देशा प्रतीचे आपले प्रेम व्यक्त केले. विद्यार्थ्यांना अद्ययावत ज्ञान देण्यासाठी राबवलेला हा उपक्रम स्तुस्त्य आहे.