
सावंतवाडी : ज्ञानदीप माध्यमिक विद्यालय वायंगणी येथे दुर्ग मावळा प्रतिष्ठान कोकण विभाग व नाथ गोसावी युवक मंडळ चिंदर यांच्या संयुक्त विद्यमाने लाठीकाठी प्राथमिक प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
या लाठी काठी प्रशिक्षणात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वायंगणी नं १, वायंगणी हायस्कूल, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हडी नं १, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हडी नं २, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तोंडवळी वरची शाळेतील ९० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
या शिबिराच्या उद्घाटन कार्यमाच्यावेळी नाथ गोसावी युवक मंडळ चिंदर सडेवाडीचे अध्यक्ष योगेश गंगाराम गोसावी, सचिव मंगेश विजय गोसावी, उपाध्यक्ष पांडुरंग विनायक गोसावी, खजिनदार हेमंत सिताराम गोसावी, प्रमोद तुकाराम गोसावी, संतोष सिताराम गोसावी. मोरेश्वर विजय गोसावी, स्वप्नील सूर्यकांत गोसावी मार्गदर्शक किशोर सरनोबत तसेच प्रशालेचे शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते