
सावंतवाडी : मुलांच्या कलागुणांना वाव मिळवून देणाऱ्या कबड्डी स्पर्धेचे आयोजन दरवर्षी करण्यात येत आहे. कबड्डी स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न केला पाहिजे असे मत माजी शिक्षणमंत्री आमदार दीपक केसरकर यांनी व्यक्त केले.
सावंतवाडी बाजारपेठ नवरात्र उत्सव मंडळ, सावंतवाडी यांच्या वतीने 'श्री. दीपकभाई केसरकर पुरस्कृत कै. राजन म्हापसेकर स्मृती चषक २०२५' भव्य जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे हे ३१वे वर्ष आहे. ते उद्घाटन आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते झाले तेव्हा बोलत होते. यावेळी शिवसेना शहरप्रमुख बाबू कुडतरकर,बाजारपेठ मित्रमंडळाचे शैलेश गवंडळकर नंदकिशोर गांवकर, नरेश डोंगरे , सुरेंद्र बांदेकर,आबा केसरकर, अर्चित पोकळे, शर्वरी धारगळकर, विश्वास घाग तसेच मित्रमंडळ पदाधिकारी उपस्थित होते.