
सावंतवाडी : आंबोली घाटात पूर्वीचा वस मंदिरापासून सावंतवाडीच्या दिशेने काही अंतरावर आज सकाळी दरड कोसळल्याने वाहतूक विस्कळीत झाली. मुसळधार पावसामुळे डोंगरावरून माती आणि दगड रस्त्यावर आल्याने दोन्ही बाजूने वाहनांची मोठी रांग लागली होती.
सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने दरड हटविण्याचे काम सुरू केले असून येत्या तासाभरात वाहतूक पूर्ववत होईल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. पहिल्याच पावसात दरड कोसळल्याने वाहनधारकांमध्ये आणि स्थानिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाने पर्यटकांना आणि वाहनधारकांना काळजी न करण्याचे आवाहन केले आहे. दरड हटविण्याचे काम वेगाने सुरू असून लवकरच रस्ता मोकळा होईल असे सांगण्यात आले आहे. या घटनेमुळे काही काळ वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. परंतु आता दरड हटविण्याचे काम सुरू झाल्याने लवकरच वाहतूक सुरळीत होईल अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.