
कणकवली : मुर्डेश्वर मंदिर येथे क्रीडांगण जमीन आरक्षित करण्यासाठी कणकवली नगरपंचायतने भूसंपादन प्रक्रिया राबवली आहे. त्यासाठी आज मुर्डेश्वर येथे जमीन मोजणी सुरू असताना जमीन मालकांनी मोजणीस विरोध दर्शवला. त्यामुळे कणकवलीतील नागरिकांनी आपला स्टेडियमला विरोध नसून काहींची जमीन वगळून आमची जमीनच भुसंपादन केली आहे, त्यामुळे आमचा मोजणीस विरोध असल्याचे सांगितले. यावेळी उमेश वाळके व उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांच्यामध्ये वादावादी झाली.
यावेळी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे,सीओ अवधूत तावडे,उमेश वाळके, शेखर राणे, संतोष राणे, अभय राणे,सखाराम राणे,उदय राणे, हनुमान राणे, भुपेश राणे,सुरेश राणे ,राजेश पिळणकार, सदा राणे ,सोहम वाळके आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.