सालईवाडा येथील रहिवासी ललित परब याचे निधन

Edited by: विनायक गावंस
Published on: October 31, 2025 23:04 PM
views 53  views

सावंतवाडी: सालईवाडा येथील रहिवासी ललित परब (वय 30 ) या युवकाचे आज सायंकाळी उपचारादरम्यान निधन झाले आहे. आज सकाळी त्यांना अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयामध्ये सामाजिक कार्यकर्ते रवी जाधव व निखिल जाधव यांच्या सहकार्याने अधिक उपचारासाठी दाखल केले होते. त्यांची प्रकृती अतिशय चिंताजनक होती. त्यामुळे उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. उद्या सकाळी दहा वाजता सावंतवाडी स्मशानभूमीमध्ये त्यांना आणून सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांकडून त्यांच्यावर अंत्यविधी करण्यात येणार आहे अशी माहिती मिळाली आहे.