
कुडाळ : कुडाळ एस. टी. बस आगाराला प्राप्त झालेल्या ५ लाल परींचा लोकार्पण सोहळा उद्या शनिवार १४ जून रोजी आमदार निलेश राणे यांच्या हस्ते कुडाळ एस. टी. बस स्थानक येथे होणार आहे.
कुडाळ एस. टी. बस आगाराला लालपरी बस मिळाव्यात म्हणून मागणी होत होती ही मागणी आमदार निलेश राणे यांच्या जवळ केल्यानंतर त्यांनी तात्काळ कुडाळ एस. टी. बस आगारासाठी ५ लाल परी बसची पूर्तता केली. या लाल परी बस कुडाळ मध्ये दाखल झाले आता या लाल परी बसचा लोकार्पण सोहळा आमदार निलेश राणे यांच्या हस्ते होणार आहे तरी सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, उपजिल्हाप्रमुख अरविंद करलकर, कुडाळ तालुकाप्रमुख विनायक राणे, ओरोस तालुकाप्रमुख दीपक नारकर यांनी केले आहे.