
मंडणगड : लालबहादूर शास्त्री हायस्कूल दहागाव. मधील विद्यार्थ्यांनी मॅरेथॉन स्पर्धेत नेत्र दीपक यश मिळवलेले आहे. स्पर्धेचे आयोजन लाटवण हायस्कूल माजी विद्यार्थी संघ (रजी) यांच्याकडून करण्यात आले होते. यामध्ये मंडणगड तालुक्यातील सुमारे 13 शाळेतील 484 विद्यार्थी सहभागी झाले होते. ही स्पर्धा चार गटात पार पडण्यात आली.होती प्रथम गट बारा वर्षाखाली द्वितीय गट पंधरा वर्षाखालील तृतीय गट अठरा वर्षाखाली आणि चौथा गट ओपन होता. सहभागी सर्व विद्यार्थ्यांना माजी विद्यार्थी संघाकडून शिल्ड ,प्रमाणपत्र व टी-शर्ट पुरविण्यात आले होते.
प्रत्येक गटातून प्रथम प्रथम विजेत्या खेळाडूस 1500 रुपये द्वितीय क्रमांकास 700 रुपये आणि तृतीय क्रमांक 500 रुपये बक्षीस देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेत लालबहादूर शास्त्री हायस्कूलचे 75 विद्यार्थी सहभागी झाले. त्यापैकी बारा वर्षाखालील गटातून सोहम भुवड प्रथम क्रमांक अर्चित वेदक द्वितीय क्रमांक ओम भुवड तृतीय क्रमांक तर श्रवण अष्टमकर हा पाचवा आला. तसेच मुलींमधून पलक पवार हिने द्वितीय क्रमांक प्राप्त केला.पंधरा वर्षे गटातून काव्या जोशी हिने प्रथम क्रमांक मिळवला.
प्रशालेचे मुख्याध्यापक विजय खाडे यांनी विजयी स्पर्धकांना गुलाब पुष्प देऊन त्यांचे अभिनंदन केले. यावेळी सौ. मानसी पालांडे, विक्रम शेले, मनोज चव्हाण, जितेंद्र कलमकर, विनया नाटेकर, अनिता पवार इत्यादी शिक्षक, शिक्षिका उपस्थित होत्या .त्याचबरोबर शिक्षकेतर कर्मचारी संजय गौड, महेंद्र गुडेकर व सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रशालेत आयोजीत स्वागत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किशोर कासारे यांनी केले.