
वेंगुर्ला : वेंगुर्ला येथील हॉस्पिटल नाका, बॅ. बाळासाहेब खर्डेकर रोड येथे नव्याने साकारलेल्या लक्ष्मी नारायण महा ई - सेवा केंद्राचे उदघाटन उद्या बुधवार दिनांक ३० एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता आयोजित करण्यात आले आहे.
प्रांताधिकारी हेमंत निकम व जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांच्या हस्ते हे उदघाटन होणार आहे. यावेळी तहसीलदार ओंकार ओतारी, वेंगुर्ले न प मुख्याधिकारी हेमंत किरुळकर, सामाजिक कार्यकर्ते शिवाजी कुबल आदी प्रमुख मान्यवर उपस्थित राहणार आहे. तरी या प्रसंगी सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन सौ. समिक्षा सचिन वालावलकर व सचिन गुरुनाथ वालावलकर यांनी केले आहे.