लखमराजे भोंसलेंची भाजप युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्षपदी निवड

Edited by: विनायक गावस
Published on: August 03, 2023 17:12 PM
views 299  views

सावंतवाडी : सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे सावंत-भोंसले यांची भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी  निवड करण्यात आली आहे. याबाबतची घोषणा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांनी केली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार ही करण्यात आली आहे.


युवराज लखमराजे यांचे काम व संघटना बांधण्याची पद्धत लक्षात घेता त्यांना राज्यस्तरावर जबाबदारी देण्यात आली आहे. आगामी काळात होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी तसेच पक्षाचे विचार तळागाळात पोहोचविण्यासाठी प्रयत्न करावेत असं या नियुक्ती पत्रात नमूद करण्यात आले आहे.