भाजप ओबीसी मोर्चाच्या वतीने बांदेश्वर मंदिरात लघुरुद्र

Edited by:
Published on: May 02, 2024 13:47 PM
views 260  views

बांदा :  भाजपा महायुतीचे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेचे उमेदवार नारायण राणे यांना ओबीसी सेलच्या माध्यमातून सर्वाधिक मताधिक्य देण्यासाठी भाजप ओबीसी मोर्चाच्या वतीने आज बांदेश्वर मंदिरात लघुरुद्र व अभिषेक करण्यात आला. यावेळी मंत्री राणे यांच्या विक्रमी विजयासाठी साकडे घालण्यात आले.

ओबीसी सेलचे जिल्हा सरचिटणीस बाळा आकेरकर यांच्या माध्यमातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाजप ओबीसी मोर्चा बांदा मंडळ अध्यक्ष सुधीर शिरसाट, तालुका सचिव सुनील धामापूरकर, जिल्हा सचिव साई धारगळकर, जिल्हा कार्यकारिणी सदस्य राकेश केसरकर, निलेश नाटेकर, जिल्हा सरचिटणीस बाळा आकेरकर, बांदा मंडळ सरचिटणीस अनिकेत धोंगडे, जिल्हा सचिव प्रवीण नाटेकर, समीर कल्याणकर आदी पदाधिकारी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी श्री बांदेश्वर चरणी लघुरुद्र आणि अभिषेक करण्यात आला. यावेळी श्री राणे यांना ओबीसी सेलच्या माध्यमातून सर्वाधिक मताधिक्य देणार असल्याचा विश्वास बाळा आकेरकर यांनी व्यक्त केला.