'लाडकी बहीण'साठी सावंतवाडी न.प. त कक्ष !

Edited by: विनायक गांवस
Published on: July 06, 2024 14:27 PM
views 170  views

सावंतवाडी : महाराष्ट्र शासनाची 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्या निर्देशानुसार सावंतवाडी नगर परिषदेकडून महिला लाभार्थ्यांसाठी ऑनलाईन, ऑफलाईन अर्ज भरण्यासाठी कक्ष स्थापन करण्यात आला आहे.

 सोमवार  ८ जुलै पासून सावंतवाडी शहरातील महिला या केंद्रावर अर्ज सादर करू शकतात. 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेकरीता सावंतवाडी शहरातील पात्र महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्याधिकारी सागर साळुंखे यांनी केले आहे.