एसटी गाड्यांची कमतरता; आंगणेवाडी भाविकांची गैरसोय

Edited by:
Published on: February 04, 2023 13:17 PM
views 172  views

कणकवली बसस्थानकात भाविकांची गर्दी; एसटी गाड्यांची कमतरता

कणकवली: आंगणेवाडी यात्रेसाठी जाणा-या भाविकांची कणकवली बसस्थानकात गैरसोय होत आहे.यात्रेसाठी जाणाऱ्या गाड्याच उपलब्ध नाहीत.यामुळे बसस्थानकात भाविकांची मोठी गर्दी झाली.गाडीसाठी रांगेत तासन तास उभे राहावे लागत आहे.                 बसस्थानकातून यात्रेसाठी जाण्यासाठी गाड्या उशिराने सुटत असल्याने भाविकांची मोठी गैरसोय झाली आहे.वयोवृद्ध भाविकांचे यामुळे हाल झाले आहेत.बसस्थानकाच्या नियोजन शुन्य कारभाराचा फटका भाविकांना सहन करावा लागत आहे.