सकलेश्वर मंदिर इथं कामगार नोंदणी शिबिराचं आयोजन...!

Edited by:
Published on: June 21, 2024 11:01 AM
views 233  views

मालवण : भाजपा अनुसूचित जाती मोर्चा मालवण तालुका व राजन आंबेरकर मित्रमंडळ आंबेरी यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी 23 जून रोजी आंबेरी श्री देव सकलेश्वर मंदिर येथे सकाळी 10 वाजता कामगार नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. असंघटित कामगार यांना संघटित करून त्यांची नोंदणी शासन दरबारी करण्यासाठी, शिबीर आयोजित केले आहे. नवीन कामगार नोंदणी, कामगार पाल्यांचे शिष्यवृत्ती याबाबत मार्गदर्शक आणि फॉर्म भरणे, कामगार रोजगार साहित्य, आरोग्य विमा, घरबांधणी अनुदान बाबत मार्गदर्शन व अन्य शासकीय योजना बाबत मार्गदर्शन केले जाणार आहे.

सकाळी मान्यवरांच्या हस्ते या शिबिराचे उदघाट्न करण्यात येणार आहे. यावेळी माजी समाजकल्याण सभापती तथा भाजपा जिल्हा प्रवक्ते अंकुश जाधव, चंद्रकांत वालावालकर, स्थानिक पदाधिकारी व मित्र मंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उवस्थित राहणार आहे. याचा लाभ कामगार बंधू भगिनींनी घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.