
सावंतवाडी : येथील सेवानिवृत्त विशेष लेखापरीक्षक एल. जी. पणदुरकर अध्यक्ष, सावंतवाडी कंझ्युमर्स सह. संस्था, अध्यक्ष - निवृत्त कर्मचारी संघटना यांना गोवा सरकारी पी.डबल्यू. डी.स्टाफ को. ऑप क्रेडिट सोसायटी लि. गोवा यांच्या सहकार्याने, नॅशनल रुरल डेव्हलपमेंट फाऊंडेशन बेळगावी व इंटिग्रेटेड सोशल वेलफेअर सोसायटी बेळगावी यांच्या वतीने देण्यात येणारा राष्ट्रीय आदर्श सहकाररत्न गौरव पुरस्कार कर्नाटक राज्याचे माजी मुख्यमंत्री वीरप्पा मोईली, बॅरिस्टर श्री अमरसिंह पाटील खासदार बेळगावी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
गोवा येथे सहावा राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला. या सोहळ्यामध्ये दिल्ली कर्नाटक महाराष्ट्र गुजरात गोवा या राज्यातील विविध क्षेत्रातील अर्थात सामाजिक शैक्षणिक वैद्यकीय इंजिनिअरिंग डेव्हलपर्स आदर्श सरकारी कर्मचारी व सहकार क्षेत्र यामध्ये उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींच्या समावेश होता. श्री पणदुरकर यांनी सहकार क्षेत्रात 50 वर्ष पेक्षा जास्त कार्य केलेले आहे. सिंधुदुर्ग व रत्नागिरी येथे शासकीय लेखापरीक्षक व विशेष लेखापरीक्षक अशी 34 वर्ष सहकार क्षेत्रात शासकीय सेवा पूर्ण केली. सेवानिवृत्तीनंतर दोडामार्ग - सावंतवाडी निवृत्त कर्मचारी संघ, सावंतवाडी कंझ्युमर्स को-ऑपरेटिव्ह सोसायटी सहकारी संस्थेचे संचालक, उपाध्यक्ष, अध्यक्ष अशी पदे भूषविली आहेत.
सन 2018 मध्ये महाराष्ट्र राज्य निवृत्ती कर्मचारी संघ पुणे यांच्याकडून राज्यस्तरीय पुरस्कार, सिंधुदुर्ग जिल्हा निवृत्त कर्मचारी संघ कुडाळ यांच्याकडून जिल्हा पुरस्कार व दिल्ली, कर्नाटक,गुजरात,महाराष्ट्र व गोवा राज्यातून राष्ट्रीय आदर्श सहकाररत्न गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.श्री पणदुरकर यांच्या या गौरवास्पद कामगिरीबद्दल आणि मिळालेल्या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.