ल. सी. हळबे महाविद्यालयात हिंदी दिन साजरा..!

Edited by: संदीप देसाई
Published on: September 25, 2023 17:56 PM
views 102  views

दोडामार्ग : राष्ट्रभाषा हिंदी दिनाचे औचित्य साधून लक्ष्मीबाई सीताराम हळबे महाविद्यालय, दोडामार्ग येथे हिंदी दिन साजरा करण्यात आला. या वेळी प्रमुख पाहुणे व प्रमुख वक्ते म्हणून बँक ऑफ महाराष्ट्र कसई - दोडामार्ग शाखेचे व्यवस्थापक विप्लवकुमार मिश्रा उपस्थित होते. या कार्यक्रमात त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष सावंत सर यांनी विद्यार्थ्यांना आपल्या अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

सर्वत्र राष्ट्रभाषा हिंदी दिन १४ सप्टेंबर रोजी शाळा, महाविद्यालय बँक अश्या विविध ठिकाणी साजरा करण्यात येतो. हिंदी भाषेचे प्रभुत्व आणि त्याचे योगदान हे देशाच्या विकासात खूप महत्वाचे आहे. विविध प्रांतात हिंदी भाषा बोलली जाते हिंदी भाषा माध्यमाने अखंड भारत देश हा जोडला गेलेला आहे. हिंदी चे महत्व आणि योगदान प्रत्येक क्षेत्रात आहे अशा भाषेचा गौरव करण्या साठी हिंदी दिवस लक्ष्मीबाई सीताराम हळबे महाविद्यालय,दोडामार्ग येथे साजरा करण्यात आला. 

विप्लव कुमार मिश्रा यांच्या हस्ते महक या   भित्तीपत्रकाचे उद्घाटन फीत कापून करण्यात आले. यावेळी मिश्रा यांनी विद्यार्थ्यांना हिंदी भाषे बद्दल मार्गदर्शन केले त्यांनी विद्यार्थ्यांना हिंदी भाषेचे सर्वांगीण योगदान, आणि हिंदी भाषेचा इतिहास विद्यार्थ्यांना सांगितला. हिंदी भाषा ही  व्यक्ती विकासचे महत्वाचे माध्यम असल्याचे प्रतिपादन त्यांनी  केले. हिंदी भाषा आत्मसात करून विद्यार्थ्यांना उत्तम करिअर घडविता येते तसेच बँक, विद्यापीठ, रेल्वे , पोस्ट ऑफिस अशा विविध ठिकाणी नोकरीची संधी ही मिळू शकते. त्यामुळे हिंदी भाषे मधून करिअर ची संधी असल्याचे या वेळी त्यानी विद्यार्थ्यांना सांगितले. प्राचार्य डॉ.सुभाष सावंत यांनी विद्यार्थ्यांना हिंदी दिन निमित्त शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमा सर्व प्राध्यापक, विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.