
वैभववाडी : कुसूर गावचे ग्रामदैवत श्री रामेश्वर व शक्ती दारुबाई देवीचा वार्षिक जत्रोत्सव २९व ३०डिसेंबरला होत आहे. त्याची तयारी सुरू झाली आहे.
कुसूर वाडिया जत्रोत्सव दरवर्षी कार्तिक महिन्यात शिवरात्री अमावास्येला होत असतो. यावर्षी काही कारणास्तव हा जत्रोत्सव मार्गशीर्ष महिन्यात होत आहे. या जत्रोत्सवाच्या पहील्या दिवशी (ता.२९) मंदिरात धार्मिक कार्यक्रम संपन्न होणार आहेत. त्यानंतर दुसऱ्या दिवशी (ता.३०) सकाळपासून ओटी भरणे, नवस बोलणे-फेडणे, दर्शन आदी कार्यक्रम होणार आहेत. या दिवशी सायंकाळी उशिरा जत्रोत्सवाची सांगता होणार आहे. या जत्रोत्सवानिमित्त मंदिर परिसराची साफसफाई करण्यात आली. तसेच विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे. भाविकांनी या जत्रोत्सवास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन देवस्थानकडून करण्यात आले आहे.