कुणकेश्वरला ४ सप्टेंबरला महाआरोग्य शिबिर..!

Edited by: नागेश दुखंडे
Published on: September 03, 2023 12:41 PM
views 139  views

देवगड :  कुणकेश्वर देवस्थान ट्रस्ट आणि ग्रामस्थ आयोजित रोटरी क्लब ऑफ मँगो सिटी व रोटरी क्लब कणकवली सेंट्रल यांच्या सहकार्याने महाआरोग्य तपासणी शिबिर व मोफत औषध वाटप चे आयोजन सोमवार ४ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत श्री देव कुणकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट भक्तनिवास कुणकेश्वर या ठिकाणी करण्यात येणार आहे . सकाळी ९ ते ११ या वेळात रक्त तपासणी करण्यात येणार असून स.१० ते दु.३ वाजेपर्यंत आरोग्य तपासणी करण्यात आले आहे. या शिबिरात ४० तज्ञ डॉक्टर्स विविध आजार व अन्य तपासणी करणार आहेत.तरी या शिबिराचा गरजू रुग्णांनी फायदा घ्यावा असे आवाहन श्री देव कुणकेश्वर देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष संतोष लब्दे व डॉ विद्याधर तायशेटे (रोटरी डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी मेडिकल कॅम्प)यांनी संयुक्त रित्या आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना केले.

श्री देव कुणकेश्वर भक्तनिवास येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेस ट्रस्ट उपाध्यक्ष दिनेश धुवाळी, सचिव शरद वाळके,कोषाध्यक्ष अभय पेडणेकर,तालुका आरोग्य अधिकारी उमेश पाटील,देवगड रोटरी प्रेसिडेंट प्रवीण पोकळे ,व अन्य विश्वस्त,रोटरी पदाधिकारी उपस्थित होते. या पुढे बोलताना डॉ विद्याधर तायशेटे म्हणाले, .या शिबिराचे उदघाटन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांच्या शुभहस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. याप्रसंगी महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे राजाराम सावंत मुंबई ,श्री देव कुणकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष संतोष लब्दे अन्य ट्रस्ट पदाधिकारी व विश्वस्त तसेच डॉ. नागनाथ धर्माधिकारी वैद्यकीय अधीक्षक कणकवली, ग्रामीण रुग्णालय, डॉ. अमेय देसाई मुंबई डॉ. उमेश पाटील तालुका आरोग्य अधिकारी देवगड, प्रणय तेली झोनल कोऑर्डिनेटर रोटरी डिस्ट्रिक्ट ३१७० डॉ.विद्याधर तायशेटे,रोटरी डिस्ट्रिकत सेक्रेटरी मेडिकल कॅम्प माजी सरपंच चंद्रकांत घाडी,प्रभारी सरपंच ग्राम पंचायत कुणकेश्वर शशिकांत लब्दे, प्रभारी सरपंच ग्रामपंचायत कुणकेश्वर हे उपस्थित राहणार आहेत. या शिबिरात प्रामुख्याने मेडिकल विभाग डॉ. अमेय देसाई डॉ. सूर्यकांत तायशेटे डॉ के.एन बोरफळकर डॉ. बी.जी शेळके, डॉ. विवेक रेवडेकर डॉ.जी टी राणे, सर्जरी विभाग डॉ. विद्याधर तायशेटे, डॉ. संदीप सावंत, डॉ. महेंद्र आचरेकर स्त्रीरोग विभाग डॉ. अनंत नागवेकर, डॉ. राजेश नवांगुळ डॉ. विशाखा पाटील,डॉ अश्विनी नवरे अस्थिरोग विभाग डॉ आर एस कुळकर्णी, डॉ ठाकूर,डॉ. योगेश नवांगुळ, डॉ.समीर नवरे, डॉ धनंजय रासम, डॉ.तन्मय आठवले, डॉ.सर्वेश तायशेटे,नाक कांन घसा विभाग, डॉ. श्रीपाद पाटील,डॉ ओंकार वेदक, हृदयरोग सर्जन, डॉ. राजगोपाल मेनन ,नेत्र रोग विभाग डॉ. बाळासाहेब जोशी, डॉ. प्रसाद गुरव ,डॉ. प्रियांका चिवटे, नेत्र रोग अधिकारी व अधिकारी कौस्तुभ देशपांडे, आर एस केळकर, एस पी धुरे, बी आर कोरे, बालरोग विभाग डॉ. प्रशांत मोघे ,डॉ.नितीन शेट्ये, त्वचारोग विभाग डॉ चेतन म्हाडगूत, जनरल फिजिशियन डॉ .नागनाथ धर्माधिकारी,डॉ. उमेश पाटील ,डॉ रामदास बोरकर,डॉ रवींद्र राठोड,डॉ सुनील आठवले,दंतरोग विभाग डॉ. अभिजीत आपटे प्राजक्ता तेली- नाचणे ,डॉ योगेश भिडे,डॉ अमेय मराठे,डॉ स्वप्निल हे उपस्थित राहणार आहेत.

या शिबिरात रक्तदाब तपासणी मधुमेह ,हिमोग्लोबिन, ईसीजी ,कान नाक ,घसा डोळे संधिवात त त्वचा विकार, पोट विकार ,महिलांच्या व मुलांच्या आजाराची तपासणी हृदय विकार व दमा तपासणी या तपासणी व औषध वाटप करण्यात येणार आहे .या शिबिराचे आयोजन राजाराम सावंत मुंबई महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल आणि रोटरी क्लब मंगो सिटी देवगड व रोटरी क्लब कणकवली सेंट्रल यांच्या विशेष सहकार्याने संपन्न होणार आहे .अधिक माहितीकरीता रामदास तेजम व्यवस्थापक श्री देव कुणकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट,कुणकेश्वर मोबा.९४०४४७५७५ तसेच मोबा ७५८८४४५६५० यांच्याशी संपर्क साधावा.असे आवाहनही  करण्यात आले आहे.