सर्वोत्कृष्ट स्वच्छता कर्मचारी म्हणून बापर्डेच्या उमेश सकपाळांचा गौरव...!

Edited by: उमेश बुचडे
Published on: September 29, 2023 19:11 PM
views 100  views

देवगड : बापर्डे कर्मचारी उमेश सकपाळचे स्वच्छतेचे कार्य कौतुकास्पद असुन,त्याच्याप्रमाणे इतर  स्वच्छता कर्मचाऱ्यांनी काम करून आपल्या गावाचे नाव रोषण करावे,असे आवाहन गटविकास अधिकारी जयप्रकाश परब यांनी स्वच्छता कर्मचारी यांना केले.

पंचायत समिती देवगडच्या वतीने स्वच्छता ही सेवा अंतर्गत देवगड तालुक्यातील स्वच्छता कर्मचारी यांचा स्वच्छता मित्र पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.यामध्ये बापर्डे स्वच्छता कर्मचारी उमेश सकपाळ यांना सर्वोत्कृष्ट स्वच्छता कर्मचारी म्हणून निवड करण्यात आली. त्याला स्वच्छता मित्र पुरस्कार व शाल देऊन गटविकास अधिकारी श्री . जयप्रकाश परब यांनी गौरवले.

या स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी  डॉ .अर्चना मर्गज, व डॉ .आकाश राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या समारंभाला कक्ष अधिकारी श्री .संतोष बिर्जे, आरोग्य विस्तार अधिकारी श्रीम .प्रतिमा वळंजु , डॉ . अर्चना मर्गज,डॉ .आकाश  राऊत , आरोग्य सेवक एस.एस.खेडेकर , गटसमन्वयक वैशाली मेस्त्री , पाणी गुणवत्ता तज्ञ हर्षदा बोथीकर आदी मान्यवर तर देवगड तालुक्यातील स्वच्छता कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विनायक धुरी तर आभार श्री . प्रतिमा वळंजु यांनी मानले.