गुणगौरव यशवंत विद्यार्थ्यांच्या..!

स्वतःतील आत्मविश्वास हीच यशाची 'गुरूकिल्ली' : अर्चना घारे
Edited by: विनायक गांवस
Published on: June 16, 2024 13:43 PM
views 133  views

सावंतवाडी : विद्यार्थी वर्गाने स्वतःतील सुप्त गुण, कौशल्य ओळखून भविष्याची निवड करावी. आपल्या आवडीच्या क्षेत्रातच प्रवेश घ्यावा. तुमचा आत्मविश्वास हीच यशाची गुरुकिल्ली आहे असं प्रतिपादन अर्चना फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा तथा राष्ट्रवादीच्या कोकण विभाग महिला प्रदेशाध्यक्षा अर्चना घारे परब यांनी केले. गुणवत्तेत कोकण विभागाचा अग्रक्रम आजवर कायम राहीला आहे‌. तोच दबदबा,तेच यश स्पर्धापरीक्षांमध्येही कायम रहावे यासाठी विद्यार्थी-पालकांनी अधिक प्रयत्न करावेत. त्यासाठी लागेल ते सहकार्य अर्चना फाउंडेशन करेल असा विश्वास अर्चना घारेंनी उपस्थित विद्यार्थी पालकांना दिला‌. अर्चना फाउंडेशनच्यावतीने आयोजित दहावी, बारावीतील यशवंत विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळ्यास विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या.

अर्चना घारे परब यांच्या संकल्पनेतून दहावी व बारावीच्या परिक्षेत घवघवीत यश संपादन केलेल्या विद्यार्थी व पालकांचा गुणगौरव सोहळा रविवारी पार पडला. अर्चना घारे यांच्या संपर्क कार्यालयात हा सोहळा मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. माजी राज्यमंत्री प्रविण भोसले, अर्चना घारे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस तालुकाध्यक्ष ऋतिक परब, युवती अध्यक्ष सावली पाटकर यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यामध्ये गुणवंत विद्यार्थ्यी सलोनी संदीप कोटकर,यज्ञेश यशवंत सावंत,स्वरा पुरुषोत्तम दळवी,प्रिती नारायणसिग पुरोहित,सिद्धी संदीप कांबळी,सेजल संजय नाईक,हर्षल राजेश नंदेश्वर,कुणाल प्रशांत हरमलकर,साईश संदीप कांबळी,वेदिका संजय ताटे,वेदा विश्वेश्वर कोळंबेकर,आर्या पुरुषोत्तम कुडतरकर,धनेश राजाराम नाईक,वैष्णवी गोविंद भांगले,राहुल झिलू गावडे, निशिगंधा सुहास सावंत,विठ्ठल राजेश गुडेकर,आमना नासीर गवंडी,डेंझील पीटर डिसोझा,अतिफा जमिर शेख,अमारा परवेझ बैग,लावण्या प्रमोद रेडकर,अफिया इरफान झारी,दिशा प्रियश नाईक,मॅकलिन पीटर लोबो,सबास्टियन फ्रान्सिस सल्डोना,पार्थ प्रशांत राऊळ ,इडोनिया डॅनी पीरिअरा,सिद्धी बबन राऊळ,मानसी सुदेश राणे,सोहम सचिन सावंत,पीयूष रघुनंदन माळकर,सोनालिका सुधाकर पेडणेकर,स्नेहल रवींद्र गावडे,रुद्रांगी रवींद्र सावंत,खुशी संदीप रेडकर आदी यशवंत विद्यार्थ्यांचा सन्मान पत्र व भेटवस्तू देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 

यावेळी ध्येयनिश्चिती  करताना शैक्षणिक सोयी सुविधा, भरपूर संधी आपणास उपलब्ध आहेत.  विद्यार्थी, पालकांनी जागृतपणे या संधीचा फायदा घ्यावा. स्वतःतील आत्मविश्वास हीच खरी यशाची गुरुकिल्ली आहे हे जाणून भविष्याचा वेध घ्यावा, धेय्य निश्चिती करावी असे मार्गदर्शन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा तथा अर्चना फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा अर्चना घारे परब यांनी उपस्थित विद्यार्थ्यी वर्गाला केले. उपस्थित विद्यार्थी पालकांना मार्गदर्शन करताना माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले म्हणाले, विद्यार्थ्यांनी चांगल्या गोष्टीचे आचरण करून जीवनात यशसंपादन करावे‌. पाल्यांनी मुलांच्या कलाने घ्यावे, त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात संधी देत पाठबळ द्यावे. विद्यार्थ्यी वर्गानेही मेहनत व कष्ट घेत आपल्यासह आई-वडील, कुटुंब, जन्मभूमीला नावलौकिक मिळवून द्यावा असे मत व्यक्त केले. या गुणगौरव सोहळ्याप्रसंगी राष्ट्रवादीचे हिदायतुल्ला खान, सुधा सावंत, सुनिता भाईप, पुजा दळवी, सावली पाटकर, ऋतिक परब, प्रा. रूपेश पाटील यांच्यासह अर्चना फाउंडेशनचे सदस्य, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.