कुडासे खुर्द ग्रा. पं. बिनविरोध | सरपंच श्रद्धा नाईक यांचं गावकऱ्यांनी केलं अभिनंदन

Edited by: संदीप देसाई
Published on: November 06, 2023 16:19 PM
views 290  views

दोडामार्ग : दोडामार्ग तालुक्यात कुडासे खुर्द ग्रामपंचायत ची निवडणूक बिनविरोध झाली आहे. या गावच्या सरपंच पदी श्रद्धा भरत नाईक या बिनविरोध निवडून आल्या आहेत. सर्व गावकरी मंडळींनी एकमताने गावाची निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय घेत इतरांसमोर एक आदर्श ठेवला आहे. तर गावचे दोन वेळा सरपंच पद भूषवून गवविकासात चांगलं योगदान देणाऱ्या सौ. संगीता देसाई यांनी यावेळी संधी असूनही इतरांना संधी देण्यासाठी एक  पुढचं पाऊल टाकल्याने समाधान व्यक्त केलं जातं आहे. 

या गावच्या निवडणुकीत तर प्रभाग 1 मधून गणपत रामदास देसाई, सानवी संदीप दळवी, प्रभाग 2 मधून राजेंद्र दशरथ गवस, अमिता अमरसिंग राणे, तर प्रभाग 3 मधून स्वागत भिवा पालव व संजना संजय सावंत यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली. तालुक्यात झालेल्या सार्वत्रिक ग्रामपंचायतींचा मतमोजणीनंतरचा अंतिम निकाल सोमवारी जाहीर झाला.

त्यामुळे यापूर्वीच बिनविरोध झालेल्या कुडासे खुर्द गावातील निवडणूक रिंगणात उतरलेल्या उमेदवारांचाही अधिकृत निवड जाहीर झाली आहे. या निवडीनंतर संपूर्ण गावाने एकत्र येत  बिनविरोध निवडणूक उमेदवारांचे गावातील ज्येष्ठ मानकरी मंडळींनी अभिनंदन केले आहे. यावेळी आनासाहेब देसाई, भरत नाईक, पांडुरंग गवस, सदाशिव गवस, अमर राणे, अनिल सावंत, लक्ष्मण गवस, रघुवीर गवस मान्यवर उपस्थित होते.