
कुडाळ : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त कुडाळ येथे शिंदे शिवसेनेकडून अभिवादन करण्यात आले. यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी बाळासाहेबांच्या स्मृतींना उजाळा दिला. यावेळी उपस्थित नेत्यांनी बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त केला. या कार्यक्रमाला संजय पडते, काका कुडाळकर, विनायक राणे, अरविंद करलकर, संजय भोगटे, रोहित भोगटे, प्रसन्ना गंगावणे यांसह शिवसेनेचे अन्य पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. बाळासाहेबांचे विचार हीच आमची शिदोरी असून सर्वसामान्यांच्या न्याय्य हक्कासाठी आम्ही सदैव तत्पर राहू अशा भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली.










