नायब तहसीलदार प्रदीप पवार यांना मातृशोक

सुनंदा लक्ष्मण पवार यांचे निधन
Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: December 28, 2025 15:13 PM
views 94  views

कणकवली : जिल्हाधिकारी कार्यालयातील सामान्य शाखेतील नायब तहसीलदार प्रदीप पवार यांच्या आई सुनंदा लक्ष्मण पवार ( वय ८३, मूळ रा. पुरळ, ता. देवगड, सध्या रा. कुडाळ ) यांचे वृद्धापकाळाने कुडाळ येथील राहत्या घरी रविवार 28 डिसेंबर रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, विवाहित मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर सोमवार दिनांक २९ डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता कुडाळ येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.