
कुडाळ : कुडाळ तालुक्यातील वेताळ बांबर्डे-आईनमळा येथील रहिवासी सदाशिव धर्माजी गावडे यांच्या राहत्या घराला आग लागून मोठे नुकसान झाल्याची घटना घडली. या आगीत घरातील कपडे, गादी, फ्रिज आणि अन्य साहित्य जळून खाक झाले आहे. स्थानिक नागरिकांना घराला आग लागल्याचे समजताच तत्काळ आग विझविण्यात आली. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. सदर आग शॉर्टसर्किटने लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे.










