
कुडाळ : तालुक्यातील पिंगुळी शेटकरवाडी येथील किल्ले गड बनवण्याच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक मानस मोर्ये यांच्या मल्हारगडाला द्वितीय क्रमांक ऋत्वि धुरीच्या राजगडाला आणि तृतीय तृतीय क्रमांक सिद्धी दळवी हिच्या रायगडला देण्यात आले . प्रथमच घेण्यात आलेल्या या स्पर्धेत 16 स्पर्धकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
श्री देव महापुरुष वाचनालय व ग्रंथालय शेटकरवाडी पिंगुळी यांच्या वतीने यावर्षी प्रथमच दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे सिंधुदुर्गसह महाराष्ट्र राज्यातील गड व किल्ले यांचे जतन व संवर्धन व्हावे गड किल्ल्याची प्रत्येकामध्ये आठवण साठवण रहावी या अनुषंगाने गड व किल्ला बनविणे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेचे परीक्षण परीक्षक कलाशिक्षक संदीप साळस्कर, गणेश मूर्तिकार सुभाष लाड, अशोक सर्वेकर, ज्येष्ठ पत्रकार अर्जुन राणे ,अजय सावंत यांनी केले. शेटकरवाडीत या किल्ले गड स्पर्धेत 16 स्पर्धकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे गड किल्ले साकारले अतिशय लक्षवेधी, रचनात्मक मांडणी, रंगसंगती आणि एकूणच सादरीकरण या अनुषंगाने या सर्व बालचिमुकल्या कलावंतांनी आपल्या कल्पक बुद्धीतून अतिशय लक्षवेधी किल्ले,गड साकारले होते या किल्ल्यामध्ये मल्हार गड ,राजगड दुर्गदुर्गेश्वर रायगड, प्रतापगड ,तोरणा गड विजयदुर्ग , सिंधुदुर्ग किल्ला आदी एकाहून एक सरस किल्ले, गड साकारले होते
या स्पर्धेत उत्तेजनार्थ प्रतापगड, तोरणा गड या किल्ल्याला देण्यात आला.या स्पर्धा परीक्षण प्रसंगी उद्योजक मदन दळवी ज्येष्ठ ग्रामस्थ सुरेश पालकर श्री देव महापुरुष वाचनालय व ग्रंथालय अध्यक्ष रमाकांत केरकर पद्माकर ठाकूर नूतन गावडे प्रसाद दळवी पप्पू दळवी,सयाजी मोर्ये रामदास आगलावे सचिन पालकर संजय सावंत संतोष शेटकर प्रवीण सावंत विजय मोर्ये बाबा मोर्ये महेश दळवी बाबाजी दळवी रुपेश धुरी सचिन पाटील गुरुनाथ दळवी छोटू दळवी नितीन सावंत यासह ग्रामस्थ , महिला बालकलाकार आदी उपस्थित होते या स्पर्धेत ओम दळवी, चंदन ठाकूर, ऋत्वि धुरी,ओम पाटील, तन्वी दळवी, सात्विक दळवी, ऋषभ सावंत, आयुष दळवी ,श्वेता मोर्ये ,चिन्मय मोर्ये, समर्थ पालकर,समीक्षा गावडे,मानस मोर्ये,विघ्नेश सावंत, भाग्येश मोर्ये, सृष्टी शेटकर, तनु सावंत ,गौरेश वटलेकर ,पार्थ कदम सह त्यांच्या सहकाऱ्यांनी सहभाग घेतला होता.
श्री देव महापुरुष वाचनालय व ग्रंथालय शेटकरवाडी पिंगुळी यांच्या वतीने दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गड, किल्ले स्पर्धेत प्रथम मल्हारगड द्वितीय राजगड तृतीय रायगडने मिळविला.










