
कुडाळ : जमीन जागेच्या वादावरुन एका- कुटुंबातील सदस्यांना लाकडी दांडे व लोखंडी रॉडने मारहाण केल्याची घटना बुधवारी रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास मुंबई-गोवा महामार्गानजीक पिंगुळी-धुरीटेंबनगर येथे घडली. या घटनेमध्ये चौघेजण जखमी झाले. असून पती-पत्नी व त्यांच्या दोन मुलांचा समावेश आहे. जखमींवर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले.
सशयितांनी सफारी कार व टाटा कंपनीचे टोचन वाहनावर मोठे दगड मारुन नुकसान केले. याबाबतची फिर्याद विजय कोंडीबा चव्हाण (रा. पिंगुळी-धुरीटेंबनगर) यांनी कुडाळ पोलीस ठाण्यात दिली. या मारहाणप्रकरणी अक्षयं जडये (रा. अणाव) याच्यासह एकूण आठ जणांवर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. जमीन जागेच्या वादावरुन अक्षय जडये याच्या सांगण्यावरुन त्याचे गडग्याचे काम करणारा गवंडी कामगार, त्याच्यासोबतचा एक काळासा दाढी असलेला गोल चेहरा असलेली व्यक्ती व आणखी अनोळखी काहीजणांनी लाकडी दांडे व लोखंडी रॉडने आपल्याला मारहाण करुन दुखापत केली, अशी फिर्याद विजय चव्हाण यांनी दिली.
पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार, २५ ऑक्टोबर २०२५ रोजी रात्री ११.१५ वाजण्याच्या सुमारास अक्षय जड़ये (रा. अणाव) याने आपल्या घरासमोर पार्किंग करून ठेवलेल्या टाटा कंपनीच्या वाहनातील हौद्यात असलेल्या टायरवर पेट्रोल टाकून आग लावून ते वाहन जाळण्याचा प्रयत्न केल्याबाबत विजय चव्हाण यांनी अक्षय जडये याच्याविरुद्ध कुडाळ पोलीस ठाणे येथे दिलेल्या फिर्यादीवरून त्यावेळी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
त्यानंतर आता बुधवारी रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास विजय चव्हाण घरी असताना अक्षय जड़ये याच्या गडग्याचे बांधकाम करण्यासाठी आलेला गवंडी कामगार (नाव, गाव माहिती नाही) व त्याच्यासोबत काळी दाढी व गोल चेहऱ्याची एक व्यक्ती असे त्यांच्या घराजवळ आले व त्यांनी चव्हाण यांना बाहेर बोलाविले. तेव्हा चव्हाण व त्यांची पत्नी घराच्या बाहेर आली. त्यावेळी ते चव्हाण यांना दोन मिनिट इकडे या, तुमच्याशी बोलायचे आहे, असे बोलून ते त्यांना वाहनाजवळ घेऊन गेले. त्यावेळी त्या गवंडी कामगाराने चव्हाण यांना ही वाहने आताच्या आता काढून टाका व घरपण खाली करून जागा मोकळी करा, असे बोलला. त्यावेळी चव्हाण यांनी आम्ही राहण्यासाठी घर बांधले आहे, आणि तुम्ही खाली करा का सांगता, असे त्याला सांगितले. त्यानंतर रस्त्यावरून चार ते पाच अनोळखी व्यक्ती धावत आल्या. त्यांच्या - हातात लोखंडी रॉड व लाकडी दांडे होते. - सर्वांनी अचानक विजय चव्हाण व त्यांच्या पत्नीला लाकडी दांड्याने मारहाण करायला करून ठेवलेल्या टाटा कंपनीच्या वाहनातील हौद्यात असलेल्या टायरवर पेट्रोल टाकून आग लावून ते वाहन जाळण्याचा प्रयत्न केल्याबाबत विजय चव्हाण यांनी अक्षय जडये याच्याविरुद्ध कुडाळ पोलीस ठाणे येथे दिलेल्या फिर्यादीवरून त्यावेळी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
त्यानंतर आता बुधवारी रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास विजय चव्हाण घरी असताना अक्षय जड़ये याच्या गडग्याचे बांधकाम करण्यासाठी आलेला गवंडी कामगार (नाव, गाव माहिती नाही) व त्याच्यासोबत काळी दाढी व गोल चेहऱ्याची एक व्यक्ती असे त्यांच्या घराजवळ आले व त्यांनी चव्हाण यांना बाहेर बोलाविले. तेव्हा चव्हाण व त्यांची पत्नी घराच्या बाहेर आली. त्यावेळी ते चव्हाण यांना दोन मिनिट इकडे या, तुमच्याशी बोलायचे आहे, असे बोलून ते त्यांना वाहनाजवळ घेऊन गेले. त्यावेळी त्या गवंडी कामगाराने चव्हाण यांना ही वाहने आताच्या आता काढून टाका व घरपण खाली करून जागा मोकळी करा, असे बोलला. त्यावेळी चव्हाण यांनी आम्ही राहण्यासाठी घर बांधले आहे, आणि तुम्ही खाली करा का सांगता, असे त्याला सांगितले. त्यानंतर रस्त्यावरून चार ते पाच अनोळखी व्यक्ती धावत आल्या. त्यांच्या - हातात लोखंडी रॉड व लाकडी दांडे होते. - सर्वांनी अचानक विजय चव्हाण व त्यांच्या पत्नीला लाकडी दांड्याने मारहाण करायला व शिवीगाळ करायला सुरुवात केली. त्यात चव्हाण यांच्या पाठीला मुका मार लागला आहे. तसेच पत्नी मंगल यांच्या डोक्याला जखम होऊन रक्तस्त्राव झाला. या दोघांना होत असलेली मारहाण पाहून चव्हाण यांचा मुलगा व मुलगी आपल्या आई-वडिलांना सोडविण्यासाठी आले. त्या दोघा मुलांनाही लाकडे दांडे व रॉडने मारहाण करण्यात आली. यात मुलगी वैशाली हिचा डावा हात मनगटामध्ये फॅक्चर झाला आहे. तसेच मुलगा विशाल यालाही किरकोळ दुखापती झाल्या आहेत. या घटनेनंतर या सर्वांनी त्यांच्या तावडीतून आपली सुटका करून घेत आपल्या घरात पळाले. त्यावेळी त्या अनोळखी व्यक्तींनी चव्हाण यांच्या घराच्या पत्र्यावर मोठे दगड मारुन घराचे पत्रे फोडून नुकसान केले. तसेच घराच्या बाहेर श्री. चव्हाण यांनी उभी केलेली टाटा सफारी कार व टाटा कंपनीचे टोचन वाहनावर दगड मारुन त्यांच्या काचा फोडुन तसेच बोनेटवर दगड मारुन नुकसान केले. चव्हाण कुटुंबियांनी आरडाओरड केल्यानंतर ते सर्वजण राखाडी रंगाची इनोव्हा कार व पांढऱ्या रंगाच्या चारचाकी वाहनातून निघून गेले. चव्हाण यांनी पोलिसांना फोन करून घटना सांगितली. पोलीस तेथे आल्यानंतर चव्हाण कुटुंबियांना कुडाळ येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. या मारहाणप्रकरणी अक्षय जडये याच्यासह आठजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.










