
कुडाळ : कुडाळ शहरातील एस.टी स्टॅन्डच्या बाहेर रात्रीच्या वेळेस लाईट लावणे व सांडपाण्याच्या दुर्गंधीचा त्रास नागरिकांना तसेच व्यवसायिकांना होत आहे. तात्काळ याबाबत आपण व्यवस्था करा. कुडाळ एसटी स्टँड मधील मागील दोन वर्षात साधारण चोरीचे पाच गुन्हे दाखल आहेत तर काही जणांची चोरी होऊ नये गुन्हे दाखल केलेले नाहीत. संध्याकाळच्या वेळी कुडाळे एसटी स्टँड मध्ये गर्दी असते त्यामुळे सदर व्यक्तींना अंधाराचा फायदा घेऊन चोऱ्यांचे गुन्हे वाढलेले आहेत.त्यामुळे आपण तात्काळ लाईट लावाव्यात तसेच सदर बस स्टॅन्ड मध्ये सांडपाण्याचा वास येऊन नागरिकांना त्रास होतोय. त्यामुळे सर्व सामान्य लोकांच्या जीवाला धोका होऊ शकतो तरी आपण योग्य वेळी योग्य पावले उचलावीत अन्यथा शिवसेना स्टाईलने उत्तर देण्यात येईल.
असे निवेदन कुडाळ शहर शिवसेना यांच्या वतीने कुडाळ आगार व्यवस्थापक यांना देण्यात आले. यावेळी कुडाळ शिवसेना शहर अध्यक्ष तथा नगरसेवक अभिषेक गावडे, तालुका सचिव राकेश कांदे, युवसेना शहर प्रमुख माजी उप नगराध्यक्ष आबा धडाम, शहर समन्व्यक राकेश नेमळेकर, शहर संघटक सुरेश राऊळ, सोशल मीडियाचे राजवीर पाटील, युवा सेना संघटक चंदन कांबळी, उपशहर प्रमुख प्रथमेश केळबाईकर,शाखा प्रमुख शिवम महाडेश्वर,युवा सेना उप शहर प्रमुख प्रथमेश कांबळी,संदेश सावंत व शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते










