
कुडाळ : १० व्या कुडाळदेशकर प्रीमियर लीग (केपीएल) २०२५ या क्रीडामहोत्सवाचे कुडाळ येथे दि. ७, ८ व ९ नोव्हेंबर या कालावधीत करण्यात आले असून देशभरातून सुमारे ८५० खेळाडूंनी नाव नोंदणी केली असून सुमारे १३०० ते १४०० ज्ञाती बांधव या महोत्सवात सहभागी होणार आहेत. या क्रीडा महोत्सवा बरोबरच ज्ञाती बांधवांचे सांस्कृतिक कार्यक्रम, कला प्रदर्शन यांचेही आयोजन करण्यात आले असल्याची माहिती पत्रकार परिषदेत कुडाळदेशकर आद्य गौड ब्राह्मण प्रतिष्ठान सिंधुदुर्ग चे अध्यक्ष अध्यक्ष रणजीत देसाई यांनी दिली.
कुडाळ मराठा समाज सभागृहात या महोत्सवाची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी महोत्सवाचे महोत्सव अध्यक्ष रणजीत देसाई, क्रीडा संघटक मनीष दाभोलकर, केदार सामंत, प्रशांत धोंड, प्रफुल्ल वालावलकर, अतुल सामंत, रोहन देसाई, मनोज वालावलकर, अभय सामंत, गुरु देसाई, सचिन देसाई, तृप्ती प्रभू देसाई, विपुल प्रभू, श्रीकृष्ण सामंत, साहिल देसाई, सागर नाईक, मनोज तेंडुलकर विकास वाघ आदी उपस्थित होते.










