
कुडाळ : 'महायुती' (भाजप, शिंदे शिवसेना) मध्ये जाणीवपूर्वक गैरसमज निर्माण करणारे आणि वाद लावणारे संदेश प्रसिद्ध करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी शिवसेनेचे (शिंदे गट) कुडाळ तालुकाप्रमुख विनायक राणे यांनी कुडाळ पोलिसांकडे केली आहे.
तालुकाप्रमुख विनायक राणे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अशा प्रकारचे कोणतेही वक्तव्य माजी आमदार राजन तेली यांनी केलेले नाही. हा प्रकार जाणीवपूर्वक महायुतीमध्ये गैरसमज पसरविण्याचा आणि वाद लावण्याचा आहे.
राणे यांनी पोलिसांना निवेदन देऊन, सदरील घटनेची सखोल चौकशी करावी आणि अशा स्वरूपाचे बनावट संदेश प्रसारित करणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
निवेदन देताना विनायक राणे यांच्यासोबत नगरसेवक गणेश भोगटे, शिवसेना उप तालुका प्रमुख देवेंद्र नाईक, चेतन पडते, राजवीर पाटील, संदेश सावंत, प्रसन्ना गंगावणे आदी पदाधिकारी उपस्थित होते.













