इनरव्हीलकडून मुलींना सायकल भेट

Edited by: निलेश ओरोसकर
Published on: October 19, 2025 17:00 PM
views 20  views

कुडाळ : चेंदवण सारख्या ग्रामीण भागातील मुलींच्या चेहर्‍यावरील हास्य हेच इनरव्हील क्लब ऑफ कुडाळच्या सायकल प्रोजेक्ट चे यश असल्याचे प्रतिपादन चेंदवण च्या माजी विद्यार्थीनी तथा माजी उपसरपंच सौ रश्मी नाईक यांनी व्यक्त केले. इनरव्हील क्लब ऑफ कुडाळ कडून सक्षम बेटी सक्षम समाज अंतर्गत श्री माऊली माध्यमिक विद्यालय चेंदवण येथील 20 गरिब व होतकरू मुलींना सौ रश्मी नाईक यांचे पुढाकारातून सायकल वितरण करण्यात आले. 

यावेळी इनरव्हील क्लब ऑफ कुडाळ अध्यक्षा सौ सानिका मदने, सचिव सौ सई तेली, माजी डिस्ट्रिक्ट चेअरमन डाॅ सायली प्रभू, चेंदवण हायस्कूल संस्था स्थानिक कमिटी अध्यक्ष देवेंद्र नाईक, रोटरी असिस्टंट गव्हर्नर सचिन मदने, रोटरी क्लब ऑफ कुडाळचे रो आनंद वेंगुर्लेकर,  इनरव्हील सदस्या सौ पद्मा वेंगुर्लेकर, इनरव्हील सदस्या तथा माजी उपसरपंच सौ रश्मी नाईक मुख्याध्यापक माणिक खोत, शिक्षक धरणेसर, सौ सिध्दी शिरसाट उपस्थित होते.

इनरव्हील क्लब ऑफ कुडाळ च्या माजी डिस्ट्रिक्ट चेअरमन डाॅ सायली प्रभू व कुटुंबिय यांनी आपल्या प्रियजनांच्या स्मृतिप्रीत्यर्थ चेंदवण हायस्कूल मधील गरिब व होतकरू 4 मुलींना स्वतःच्या योगदानातून सायकल प्रदान केल्या.डाॅ सायली प्रभू यांचे दातृत्वाचे पालकांनी मानले आभार.

इनरव्हील क्लब ऑफ कुडाळ कडून चेंदवण हायस्कूल येथे इनरव्हील सायकल बॅंक प्रोजेक्ट सुरू केल्याबद्दल माहिती इनरव्हील अध्यक्षा सौ सानिका मदने यांनी दिली. या प्रोजेक्ट अंतर्गत शाळेकडे सायकल उपलब्ध होणार असून दरवर्षी शाळेने गरिब गरजू होतकरू मुलींना तात्पुरत्या वापरासाठी सायकल उपलब्ध करून द्यायची व वर्ष संपल्यावर त्या सायकल शाळेकडे जमा करायच्या. या प्रोजेक्ट साठी डाॅ सायली प्रभू यांनी दिलेल्या 4 सायकलींचा समावेश करण्यात आल्याचे इनरव्हील अध्यक्षा सौ सानिका मदने यांनी सांगितले.

चेंदवण हायस्कूल मधील 20 मुलींना वितरित करण्यात आलेल्या सायकलींपैकी चिपी, कवठी, चेंदवण, वालावल येथील मुलींचा समावेश आहे. ग्रामीण भागातील गरिब व होतकरू मुलींना सायकल वितरण प्रोजेक्ट हा इनरव्हील क्लब ऑफ कुडाळ सारखी आंतरराष्ट्रीय सेवाभावी संस्था राबवत आहे हि बाब कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन चेंदवण हायस्कूल संस्था स्थानिक शाळा समिती अध्यक्ष श्री देवेंद्र नाईक यांनी केले. सूत्रसंचालन सिध्दी शिरसाट तर आभार धरणे यांनी केले .