
देवगड : श्री वटवृक्ष स्वामी समर्थ महाराज देवस्थान, अक्कलकोट येथे नुकतेच श्री स्वामी समर्थ महाराज यांचे दर्शन राष्ट्रीय युवक काँग्रेस सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष किरण टेंबुलकर यांनी आपल्या कार्यकर्त्यांसमवेत घेतले.
या दरम्यान वटवृक्ष स्वामी समर्थ महाराज देवस्थान, अक्कलकोट मंदिराचे चेअरमन तथा अक्कलकोट माजी नगराध्यक्ष विद्यमान नगरसेवक महेश इंगळे यांच्या हस्ते युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण टेंबुलकर यांचा सत्कार करण्यात करण्यात आला. यावेळी युवक काँग्रेस देवगड अध्यक्ष सुरज घाडी, किंजवडे सोसायटी सदस्य दिपक पाडावे आदी उपस्थित होते.