
कुडाळ : भारतीय बौद्ध महासभा गाव शाखा खोटले व पंचशील ट्रस्ट ओरोस यांच्या वतीने खोटले गावात वर्षावास कार्यक्रम नुकताच घेण्यात आला. या वर्षावास कार्यक्रमामध्ये मुंबई येथून आलेले पूज्य भंते प्रज्ञावंत यांनी प्रवचन केले. तसेच अजगनी गावातील आयुष्यमान संतोष तांबे व त्यांचे सहकारी उपस्थित होते.
आषाढ पौर्णिमा १० जुलै २०२५ ते अश्विन पौर्णिमा ०७ ऑक्टोबर २०२५ , या कालावधीत वर्षावास कार्यक्रम सुरू आहे. या कार्यक्रमांमध्ये श्रद्धावान उपासक उपासिका यांनी पूज्य भंतेजी यांना याचना करून, धम्म समजून घेत धम्म देसना व भोजनदान करण्यात येते. खोटले येथे या वर्षावास कार्यक्रमामध्ये भारतीय बौद्ध महासभा गाव शाखेचे अध्यक्ष संजय खोटलेकर, उपाध्यक्ष सिद्धार्थ कदम, सचिव प्रा. वैभव कदम, अशोक जाधव, राहुल कदम, बौद्धाचार्य शशिकांत कदम, अनंत कदम, रामगड गाव शाखेचे जेष्ठ सभासद ज्ञानदेव जाधव, महेश जाधव, तक्षशिला महिला कार्यकारणीच्या सदस्या स्मिता कदम, अमिता जाधव, आरती कदम, मनाली कदम, रूपाली कदम आदी उपस्थित होत्या.