
कुडाळ : कोकण मराठी साहित्य परिषदेच्या सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्षपदाची सूत्र पुन्हा एकदा मंगेश मसके यांच्याकडे सोपविण्यात आली आहेत. कोमसापच्या जिल्हा कार्यकारिणीची सभा आज संत राऊळ महाराज महाविद्यलयात झाली. त्या सभेत मंगेश मसके यांची पुढील तीन वर्षांसाठी अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. जिल्हा प्रतिनिधी म्हणून रुजारिओ पिंटो, कोषाध्यक्ष पदी अनंत वैद्य तर कार्यवाहपदी ऍड. संतोष सावंत यांची निवड करण्यात आली आहे. निरीक्षक म्हणून अनंत वैद्य यांनी काम पाहिले.
कोकण मराठी साहित्य परिषदेच्या सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणी मंडळाची सभा आज सकाळी अध्यक्ष मंगेश मसके यांच्या अध्यक्षतेखाली संत राऊळ महाराज महाविद्यालयात झाली. या वेळी पुढील तीन वर्षासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याची कार्यकारणी निवडण्यात आली. घटनेप्रमाणे कुडाळ, कणकवली, सावंतवाडी आणि मालवण या चार तालुक्याचे अध्यक्ष आणि जिल्हा प्रतिनिधी, अनुक्रमे संतोष वालावलकर व मंगेश मसके, माधव कदम व संदीप वालावलकर, दीपक पटेकर व ऍड. संतोष सावंत, सुरेश ठाकूर व रुजारिओ पिंटो या आठ जणांनी नवीन अध्यक्षांची निवड केली. कणकवली शाखेचे अध्यक्ष माधव कदम यांनी मंगेश मसके यांनी तीन वर्ष चांगलं काम काम केलं त्यामुळे त्यांची निवड करावी अशी सूचना मांडली. त्याला कुडाळ शाखेचे अध्यक्ष संतोष वालावलकर यांनी अनुमोदन दिल. त्यानंतर सर्व सदस्यांनी एकमताने मंगेश मसके यांनी अध्यक्षपदी निवड केली. निरीक्षक अनंत वैद्य यांनी मंगेश मसके यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करून त्यांचे अभिनंदन केले.
त्यानंतर मंगेश मसके यांनी कोमसापची सिंधुदुर्ग जिल्ह्याचे कार्यकारणी मंडळ जाहीर केले. त्यामध्ये अध्यक्ष मंगेश मसके, जिल्हा प्रतिनिधी रुजारिओ पिंटो, कोषाध्यक्ष अनंत वैद्य, कार्यवाह ऍड. संतोष सावंत, सह कार्यवाह सुरेश ठाकूर, सदस्य - प्रा. संतोष वालावलकर, सुरेश पवार, माधव कदम, संदीप वालावलकर, दीपक पटेकर आणि चिराग बांदेकर यांचा समावेश आहे.
यावेळी मंगेश मसके यांनी विविध समित्यांच्या प्रमुखांची देखील नावे जाहीर केली. यामध्ये महिला साहित्य संमेलन समिती प्रमुख सौ. वृंदा कांबळी, जनसंपर्क समिती प्रमुख भरत गावडे, विधी व कायदा समिती प्रमुख ऍड. अमोल सामंत, लेखा परीक्षण समिती प्रमुख सीए केशव फाटक, सामाजिक कार्य समिती प्रमुख रणजित देसाई, प्रिंट मीडिया समिती प्रमुख गणेश जेठे, सोशल मीडिया समिती प्रमुख निलेश जोशी, ग्रंथनिवड / पुरस्कार समिती प्रमुख अभिमन्यू लोंढे यांचा समावेश आहे.
कोमसापची युवाशक्ती वाढविण्यावर आपला भर राहील असं मंगेश मसके यांनी यावेळी सांगून युवा साहित्यिकाचा मेळावा लवकरच कुडाळ मध्ये घेणार असल्याचं सांगितलं. यामध्ये कोमसापचेच नव्हेत तर जिल्ह्यातील सर्व युवा साहित्यिक सहभागी होतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. या सभेला मंगेश मसके, अनंत वैद्य, माधव कदम, रणजित देसाई, गणेश जेठे, संदीप वालावलकर, सौ. वृंदा कांबळी, डॉ. सौ. दीपाली काजरेकर, सुरेश पवार, संतोष वालावलकर, रुजारिओ पिंटो, सुरेश ठाकूर, स्वाती सावंत, सी.ए. केशव फाटक, ऍड. संतोष सावंत, दीपक पटेकर, अभिमन्यू लोंढे, निलेश जोशी, रुपेश पाटील, उषा परब, ऍड. नकुल पार्सेकर, विठ्ठल कदम उपस्थित होते. भरत गावडे यांनी उपस्थितांचे आभार मानल्यावर सभेचे कामकाज संपले.