
कुडाळ : संत रोहिदास भवनासह आपल्या समाजाचे जे मूलभूत प्रश्न, समस्या आहेत त्या प्राधान्याने सोडवण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे, समाजाचे जिल्हा मंडळ आणि अधिकारी यांच्या उपस्थितीत लवकरच हा प्रश्न मार्गी लागेल असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळ जिल्हा अध्यक्ष सुजित जाधव यांनी विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यात केले.
सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळ सिंधुदुर्ग तालुका कुडाळ शाखा यांच्यावतीने विद्यार्थी गुणगौरव, तसेच समाजातील सेवानिवृत्त, विशेष उल्लेखनीय कार्य केलेल्याचा सत्कार सोहळा आज मराठा समाज हॉल कुडाळ येथे मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. या सोहळ्याचे उद्घाटन कार्यक्रमाचे कुडाळ तालुका शाखा अध्यक्ष संतोष चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली राजापूर पंचायत समितीचे माजी गटविकास अधिकारी नामदेव पवार यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी सेन्सॉर बोर्ड सदस्य रंगकर्मी विजय चव्हाण, मालवण गटविकास अधिकारी श्याम चव्हाण, जिल्हा सचिव चंद्रसेन पाताडे, बँक संचालक आत्माराम ओटवणेकर, जिल्हा प्रवक्ता के. टी. चव्हाण, प्रकाश चव्हाण, माजी तालुका अध्यक्ष मनोहर सरमळकर, भवन समिती प्रमुख श्रीराम चव्हाण, नायब तहसीलदार प्रदीप पवार, रामदास चव्हाण, सुभाष बांबुळकर, प्रिया आजगावकर, अँड. राजीव कुडाळकर, कावेरी चव्हाण, राजन वालावलकर, सुरेश पवार, मधुकर जाधव, मधुकर चव्हाण, प्रा. नितीन बांबर्डेकर, सचिव नरेंद्रकुमार चव्हाण कोषाध्यक्ष गुरुनाथ तेंडुलकर, प्रमोद आजगावकर, मनीषा पाताडे, गणपत चव्हाण, राजेश चव्हाण ,सुरेश पिंगुळकर, रमेश कुडाळकर, बी.बी चव्हाण, समाजबांधव विद्यार्थी आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष जाधव म्हणाले पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून रोहिदास भवन साठी 25 लाख रुपये मंजूर झालेले आहेत. येणाऱ्या दोन वर्षात ही इमारत दोन मजली होणार असून आपल्या समाजाच्या प्रत्येक गावात स्मशानशेड इतर जे काही प्रश्न आहेत ते सोडवण्याच्या दृष्टिकोनातून आपले चर्मकार समाज जिल्हा मंडळ यांची पालकमंत्री नितेश राणे व अधिकारी वर्गाची विविध विषयाबाबत समाजाच्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण होण्यासाठी बैठक घेऊन प्रयत्न केले जाणार आहेत.
कार्यक्रमाचे उद्घाटक नामदेव पवार यांनी विद्यार्थी गुणगौरव सोहळा हा आपल्या समाजातील मुलांना प्रोत्साहन देण्याचा कौटुंबिक उत्सव सोहळा आहे. त्यांच्या पाठीवर मारलेली कौतुकाची थाप भविष्यात त्यांच्यासाठी फलश्रुतीदायी ठरणार आहे. 2026 चा जो विद्यार्थी गुणगौरव सोहळा होणार आहे. त्यामध्ये दहावी बारावी परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांना मी बक्षीस देईन असं जाहीर केले.
प्रास्ताविकात सचिव नरेंद्र चव्हाण यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव हा त्यांना त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारता यावी त्यांना भविष्यात वाटचाल करताना प्रोत्साहन मिळावे म्हणून हा सोहळा गेली कित्येक वर्ष राबवला जात आहे असे सांगितले.महिन्याभरातच नियुक्त झालेल्या नवीन अध्यक्ष सर्व टीमचा यावेळी सत्कार मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला, यावेळी तालुका चर्मकार समाजातील 2025 मध्ये स्कॉलरशिप नवोदय परीक्षा उत्तीर्ण, दहावी, बारावी पदवी, पदविका, पदव्युत्तर परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थी यांचा गौरव सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला तसेच सेवानिवृत्त झालेले अधिकारी, उल्लेखनीय कामगिरी केलेले व विविध समित्या संस्थावर निवड झालेल्या समाजबांधव यांचा सुद्धा यावेळी सत्कार करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात समाजाच्या महिला भगिनी यांनी ईशस्तवन, स्वागतगीत सादर करून केले. संगीत साथ हार्मोनियम आनंद परब ,तबला साथ भावेश परब यांनी दिली गुणवंत विद्यार्थ्यांना भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. नितीन बाबर्डेकर यांनी केले तर आभार सहसचिव राजेश चव्हाण यांनी मानले
अनेक मान्यवरांनी गौरव सोहळ्यात केला कौतुकाचा वर्षाव
आजच्या स्पर्धात्मक युगात वाटचाल करताना जिद्द चिकाटी मेहनत आत्मविश्वासाच्या जोरावर प्रत्येकाने वाटचाल केली पाहिजे. समाजाने आपल्यासाठी जे केले आहे ते भविष्यात मोठे झाल्यावर समाजाप्रती असणारे प्रेम समाजाच्या ऋणातून आपण कधी मुक्त होऊ शकत नाही याची भावना प्रत्येकाने जोपासली पाहिजे. मोबाईलच्या विळख्यातून बाहेर पडून प्रत्येकाने वाचन संस्कृती आत्मसात केली पाहिजे. अशा प्रकारचे प्रतिपादन तालुका अध्यक्ष संतोष चव्हाण, विजय चव्हाण प्रदीप पवार श्रीराम चव्हाण, आत्माराम ओटवणेकर, प्रकाश चव्हाण, चंद्रसेन पाताडे, श्याम चव्हाण आदी मान्यवरांनी व्यक्त करून विद्यार्थी पालकांना मार्गदर्शन केले.