
कुडाळ : इमदाद ग्रुप कुडाळ यांच्या वतीने बाबा चांद दर्गा येथे दहावी आणि बारावीमध्ये विशेष प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा तसेच डॉक्टर, वकील, सीए (CA), आणि बी. फार्मसी (B. Pharmacy) पदवीधरांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. या सोहळ्याला अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून आवटे सर, बकतावर मुजावर, इलियाज शेख, सादिक मेमन, जहूर मुजावर, वसीम बागवान, इदृश शेख, असलम साठी, सिराज शहा, शब्बीर मेमन, फारूक दोस्ती, मोहसीन बागवान, शरपू शेख, इम्तियाज शेख, परवेज मुजावर, आसिफ मुजावर, इम्तियाज मुल्ला, आणि तबरेज शेख हे उपस्थित होते.
इमदाद ग्रुपने समाजातील गुणवंतांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांचे अभिनंदन करण्यासाठी हा स्तुत्य उपक्रम राबवला. या सत्कारामुळे विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस प्रेरणा मिळेल आणि इतरांनाही शिक्षणात उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.