
कुडाळ : चेंदवण आंबेडकर नगर येथील अनंत चेंदवणकर यांच्या घरावर दिनांक २५/०७/२०२५ रोजी फणसाचे झाड पडुन घराचे मोठे नुकसान झाले आहे. अनंत चेंदवणकर व पत्नी यांना मुलबाळ नसुन अनंत हे पॅरालेसिस या आजाराने त्रस्त असल्याने जाग्यावर आहेत. सध्या कुटुंबाला घर दुरुस्ती साठी तात्काळ मदतीची गरज असल्याचे शिवसेना जिल्हा संघटक श्री.रुपेश पावसकर यांना समजताच पावसकर यांच्या माध्यमातून अनंत चेंदवणकर यांच्या पत्नीकडे आर्थिक मदत देण्यात आली.
यावेळी शिवसेना कुडाळ तालुकाप्रमुख विनायक राणे, शिवसेना माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजय पडते, दशावतार राज्य कमिटी सदस्य देवेन नाईक, शिवसेना नेरूर विभाग प्रमुख किशोर सावंत, युवासेना उपजिल्हाप्रमुख संदेश नाईक, देवेन नाईक आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.