
कुडाळ : रोटरी क्लब ऑफ कुडाळ कडून श्री लिंगेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय तुळसूली येथे दहावीच्या विद्यार्थ्यांना आयडीयल स्टडी ॲपचे वितरण अध्यक्ष राजीव पवार व असिस्टंट गव्हर्नर सचिन मदने यांचेहस्ते करण्यात आले.यावेळी रोटरी क्लब ऑफ कुडाळ चे सचिव मकरंद नाईक, सदस्या सई तेली ,प्रभारी मुख्याध्यापक सौ मनाली नाईक, पालक प्रतिनिधी प्रविण वारंग, आदी उपस्थित होते. यावेळी आयडीयल स्टडी ॲपचे प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन असिस्टंट गव्हर्नर सचिन मदने यांनी विद्यार्थ्यांना केले.
आयडीयल स्टडी ॲपमुळे विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती वाढणार असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळेल असे प्रतिपादन रोटरी क्लब ऑफ कुडाळचे अध्यक्ष राजीव पवार यांनी व्यक्त केले. यावेळी अध्यक्ष रो राजीव पवार, असिस्टंट गव्हर्नर रो.सचिन मदने ,सचिव रो मकरंद नाईक, रो सई तेली, प्रभारी मुख्याध्यापक सौ मनाली नाईक, प्रविण वारंग आदी उपस्थित होते