
कुडाळ : संपूर्ण जिल्ह्यातील आंबेडकरी समाज एकत्र आल्याशिवाय खऱ्या अर्थाने समाजपरिवर्तन होणार नाही. महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 'शिका,संघटित व्हा आणि संघर्ष करा' या शिकवणीनुसार समाजाचं सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक आणि राजकीय परिवर्तनाची लढाई लढण्यासाठी आणि बाबासाहेबांना अभिप्रेत असलेला संपूर्ण समाज संघटनात्मक मतभेद बाजूला ठेऊन एका निळ्या झेंड्याखाली एकत्र येण्याचं धारिष्ट्य दाखविणारी ही बैठक आणि एकजूट कायम ठेवण्याचा निर्धार करणारी हि बैठक निश्चितपणे आशावादी ठरेल अशी अनेकांनी मनोगते व्यक्त केली.
कुडाळ येथील मराठा हॉल मध्ये झालेल्या बैठक बहुजन समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष पी. के. चौकेकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी वंचीत बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष महेश परूळेकर, आर.पी.आय. (आठवले) पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सहसचिव रमाकांत व जिल्हा परिषद समाजकल्याणचे माजी सभापती अंकुश जाधव, भारतीय बौध्द महासभा केंद्रीय माजी सहसचिव प्रभाकर जाधव, कणकवली नगर पंचायतचे माजी नगरसेवक गौतम खुडकर यांच्यासह विजय कदम, वासुदेव जाधव, विलास कदम, गुरुनाथ कासले, श्रीराम जाधव, संदेश कदम, सत्यवान तेंडूलकर, मंगेश गांवकर, सुशिल कदम, चंदू वालावलकर, किरण जाधव, सूर्यकांत साळुंखे, के.एस .कदम, शंकर जाधव, विष्णू तेंडूलकर, ॲड.एस.के.चेंदवणकर, वामन कांबळे, आनंद धामापूरकर, जयंत जाधव, सिध्दार्थ जाधव, संजय डिंगणकर, प्रकाश कांबळे, सत्यवान साठे, पी.के.वाडेकर, नरेंद्र पेंडूरकर, निलेश वर्देकर, संदिप जाधव, विलास कुडाळकर, श्यामसुंदर वराडकर, अंकुश जाधव, ॲड.नामदेव मठकर, दिलीप वाडेकर, विश्वनाथ पडेलकर, दिपक जाधव, प्रशांत जाधव, आयुनी.पूजा जाधव या विविध संघटनाच्या प्रतिनीधी मधून समन्वयासाठी निमंत्रक समिती गठीत करण्यात आली. जिल्ह्यात बेरोजगारीचा गंभीर प्रश्न आहे अनुसूचित प्रवर्गातील अनेक सुशिक्षीत बेरोजगार आहेत. शासकीय कार्यालयातील नोकरभरती तील मागासवर्गीयांची अनुशेष भरण्यात यावा, मॅट्रीक पूर्व व मॅट्रीकेत्तर विद्यार्थी शिष्यवृत्ती पासून विद्यार्थी वंचीत राहत आहेत, स्मशानभूमीचे प्रश्न, अनुदानीत कर्ज प्रश्न यांसारखे गंभीर प्रश्न जिल्ह्यात आहेत. महासंघाच्या माध्यमातून शासन स्तरावर पाठपुरावा करून सोडवू प्रसंगी आंदोलनात्मक पवित्र घेतला जाईल. असा इशारा बैठकीतून देण्यात आला.