
कुडाळ : कसाल गावाचे सरपंच व माजी पंचायत समिती सदस्य राजन परब यांचे सुपुत्र आनंद राजन परब यांचे अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले. शनिवारी कुडाळ - मालवणचे आमदार निलेश राणे यांनी परब कुटुंबीयांच्या घरी जाऊन त्यांना धीर दिला व शोक व्यक्त केला. यावेळी उपनेते संजय आग्रे, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, सरचिटणीस दादा साईल, उपजिल्हाप्रमुख अरविंद करलकर, तालुकाप्रमुख दीपक नारकर, दीपक पाटकर आदी उपस्थित होते.