LIVE UPDATES

काका कुडाळकरांची समता परिषदच्या रत्नागिरी - सिंधुदुर्ग समनव्यकपदी नियुक्ती

Edited by: निलेश ओरोसकर
Published on: June 26, 2025 19:24 PM
views 35  views

कुडाळ : अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद संस्था अध्यक्ष व अन्न नागरी पुरवठा मंत्री श्री छगन भुजबळ यांनी सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील OBC समाजातील जनतेचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी काका कुडाळकर यांची जिल्हा समन्वयक पदी नियुक्ती केली. ओबीसी समाजाच्या सामाजिक आर्थिक बाजू कडे दुर्लक्ष केलं जातंय कोणत्याही पक्षाचा नेता या समता परिषदेत सहभागी होऊ शकतो. महायुतीचा उपकेंद्र चालू करण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील राहणार. योजनांचा लाभ मिळण्यावर प्राधान्य देण्यार असल्याचं काका कुडाळकर यांनी सांगितलं...