
कुडाळ : मुंबई गोवा महामार्गावर हुमरमळा येथे मंगळवारी झालेल्या अपघातात अणाव दाबाचीवाडी येथील अनुष्का अनिल माळवे (वय १८) हिचा दुर्दैवी मृत्यू झाला असून माळवे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आज माजी आमदार वैभव नाईक यांनी अनिल माळवे यांच्या घरी भेट देत कुटूंबियांचे सांत्वन केले व धीर दिला. याप्रसंगी अणाव सरपंच लीलाधर अणावकर, माजी सरपंच आप्पा मांजरेकर, शिवसेना लॉटरी सेना अध्यक्ष मनोज वारंग, सचिन वारंग आदी उपस्थित होते.