कुडाळ बनतेय राजकीय घडामोडींचे प्रमुख केंद्र ?

Edited by: प्रसाद पाताडे
Published on: January 03, 2024 16:10 PM
views 378  views

कुडाळ वार्तापत्र : सत्ताधारी भाजप विरुद्ध ठाकरे शिवसेना यांच्यातील मागील आठवडाभरात उडालेल्या शाब्दिक चकमकी, त्यांनतर विकसित भारत संकल्प यात्रेदरम्यान झालेली परस्पर विरोधी घोषणाबाजी, तर तालुक्यातील भूमिपूजनांचा श्रेयवादावरून आमने सामने आलेले भाजप विरुद्ध ठाकरे गट या महत्वाच्या घटनांबरोबरच तालुक्यातील मनसेच्या नाराज गटाने उसपलेल राजीनामा सत्र, आमदार वैभव नाईक यांचे खंदेसमर्थक  तानाजी पालव यांचा तडकाफडकी राजीनामा, सबमरीन प्रकल्पावरून सुरू असलेले आरोप प्रत्यारोप, यामुळे कुडाळ तालुका सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकीय पटलावर मागील आठवडाभर विशेष चर्चेत राहिला.

      खरं कुडाळ तालुका आणि शहर आज गतिमान विकासासाकडे वाटचाल करत असताना कणकवली पाठोपाठ राजकीय घडमोडींच केंदेबिंदू बनतो की काय? असा प्रश्न सध्या कुडाळ मध्ये सुरू असलेल्या राजकीय घडामोडींवरून उपस्थित होत आहे. 

     कुडाळ तालुक्यातील डिगस येथे मठ पणदूर घोडगे रस्त्याच्या उद्घाटन प्रसंगी ठाकरे शिवसेना विरुद्ध भाजप यांच्यात झालेली शाब्दिक चकमक, व आमदार वैभव नाईक यांना उद्घाटनापासून रोखण्याचा झालेला प्रयत्न, तर आमदार वैभव नाईक यांनी धक्काबुक्की झाल्याचे नमूद करत ठाकरे गटाकडून भाजपच्या त्या कृतीचा करण्यात आलेला निषेध, यामुळे डिगस गाव तालुक्याच्या राजकीय पटलावर मुख्य चर्चेत राहिलं. तर दुसरीकडे कुडाळ नगरपंचायत सर्वसाधारण सभेत महाविकास आघाडी विरुद्ध भाजप नगरसेवक यांच्यात विकसित भारत संकल्प यात्रेच्या आयोजनावरून व मोदी सरकार या उल्लेखावरून ही यात्रा उधळून लावणार असल्याचे महाविकास आघाडी करून सांगण्यात आले होते. व त्यानंतर पोलीस प्रशासनासह भाजप व ठाकरे गटाला पोलीस प्रशासनाकडून कायदा व सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर नोटीसा बजावल्या. मात्र तरीही प्रत्यक्षात विकसित भारत संकल्प यात्रेदरम्यान झालेली शाब्दिक बाचाबाची, स्पीकरचा वाढलेला आवाज, महाविकास आघाडी करून मोदी सरकार विरोधात देण्यात आलेल्या घोषणा आणि भाजपकडून देण्यात आलेल्या मोदी सरकारच्या समर्थनार्थ घोषणा यामुळे विकसित भारत संकल्प यात्रेदरम्यान एकच गोंधळ उडाला होता. भाजपनेते निलेश राणे यांनी तर कुडाळ पोलीस ठाणे गाठत पोलीस ठाण्यात ठिय्या मांडत, पोलीस निरीक्षक रुणाल मुल्ला यांना धारेवर धरले. शासनाचा कार्यक्रम रोखल्याप्रकरणी संबंधितांवर शासकीय कामांत अडथळा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची त्यांनी मागणी केली होती. व त्यानंतर कुडाळ नगरपंचायत उपनगराध्यक्ष किरण शिंदे, नगरसेवक मंदार शिरसाट, उदय मांजरेकर, संतोष शिरसाट व माजी नगरसेवक सचिन काळप यांच्यासह अन्य दहा ते 12 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी आमदार वैभव नाईक यांनी कुडाळ पोलीस ठाणे गाठत ठिय्या मांडत फक्त आमच्यात नगरसेवकांवर गुन्हे का ? असा सवाल उपस्थित करत पोलीस निरीक्षक मुल्ला यांना धारेवर धरले होते.  सरकारची हुकूमशाही चालू देणार नाही असा इशाराही त्यांनी दिला होता. त्यामुळे ही संकल्प यात्रा कुडाळात मात्र वादंग निर्माण करून गेली हे खरं. 

तर दुसरीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी 'आमच्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरले आहे' असे म्हणत आपल्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला.  त्यानंतर त्याचे पडसाद वेंगुर्ले दोडामार्ग बरोबरच प्रामुख्याने कुडाळ तालुक्यामध्ये पहावयास मिळाले. तालुक्यातील मनसे पदाधिकारी यांचही राजीनामा सत्र सुरु झाले.

     दरम्यान वेंगुर्ला निवती समुद्र किनारी होणाऱ्या सबमरीन बोट ( पाणबुडी ) प्रकल्पावरून वादंग उठला होता, यावर कुडाळ मालवण मतदार संघाचे आमदार वैभव नाईक यांनी हा प्रकल्प गुजरातला गेल्याचा पोलखोल करत आपण असं झाल्यास गप्प बसणार नाही असा इशारा दिला होता. तर अगदी या उलट प्रकल्प कुठेही गेलेला नाही, हा प्रकल्प नियोजित वेंगुर्ला समुद्रकिनारीच होणार असल्याचे निलेश राणे यांनी सांगत उलट वैभव नाईक यांना लक्ष केलं होत. अखेर आता मंत्रालय स्तरावर पालकमंत्री यांनी बैठक घेऊन अधिकृत माहिती दिल्याने या मुद्द्यावर तूर्तास पडदा पडला आहे.  या राजकीय घटनाबरोबरच कुडाळ हायस्कूल कुडाळ येथे झालेली रोख रकमेची चोरी अशा घटांनानी संपूर्ण जिल्ह्यात गेला आठवडाभर कुडाळ तालुका जिल्ह्यात चर्चेत राहिला हे विशेष.