
सिंधुदुर्गनगरी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या शालांत परीक्षेचा कुडाळ तालुक्याचा दहावीचा निकाल ९९. १४ टक्के लागला आहे. तालुक्यात प्रथम क्रमांक कुडाळ हायस्कूल कुडाळचा चैतन्या कृपेश सावंत 100 टक्के, द्वितीय क्रमांक स्मितेश विनोद कडोलकर 99.40 टक्के, तृतीय क्रमांक निधी भास्कर सावंत व रिया राकेश पाटणकर 99 टक्के यांनी प्राप्त केला .कुडाळ तालुक्यातील ३४ पैकी २७ शाळांचा निकाल १०० टक्के लागला. तालुक्यातील १ हजार ६४२ पैकी १ हजार ६२८ विद्यार्थी पास झाले आहेत. यामध्ये विशेष श्रेणीत ७३६, प्रथम श्रेणीत ५९० , द्वितीय श्रेणीत २६६ विद्यार्थी पास झाले आहेत.
शाळा निहाय निकाल व गुणानुक्रमे प्रथम तीन विद्यार्थी पढीप्रमाणे...कुडाळ हायस्कूल -98.16 टक्के, क.म.शि.प्र. मंडळ संचलित कुडाळ हायस्कूल कुडाळ या प्रशालेतून दहावी परीक्षेसाठी 217 विद्यार्थी बसले होते. पैकी 213 विद्यार्थी उत्तीर्ण होऊन प्रशालेचा निकाल 98.16 टक्के एवढा लागला. प्रथम क्रमांक चैतन्या कृपेश सावंत 100 टक्के, द्वितीय क्रमांक स्मितेश विनोद कडोलकर 99.40 टक्के, तृतीय क्रमांक निधी भास्कर सावंत व रिया राकेश पाटणकर 99 टक्के यांनी प्राप्त केला. संस्कृत विषयात 13 विद्यार्थ्यानी 100 टक्के गुण प्राप्त केले.वेताळबांबर्डे विभाग शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शिवाजी इंग्लिश स्कूल गुरूवर्य शशिकांत अणावकर सर विद्यानगरी पणदूरतिठा या प्रशालेचा दहावीचा निकाल 98.70 टक्के लागला. या प्रशालेतून 154 विद्यार्थी परीक्षेला बसले होते पैकी 152 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. प्रथम क्रमांक यशिका नागेंद्र परब 98.40 टक्के, द्वितीय क्रमांक सृष्टी संदीप गवाणकर 96.40 टक्के, तृतीय क्रमांक मानस गुणेश बांबर्डेकर 95.60 टक्के, चौथा क्रमांक सिद्धी जनार्दन मांजरेकर 95.40 टक्के, पाचवा क्रमांक साक्षी दत्तात्रय साळकर 95 टक्के. पाट हायस्कूलचा निकाल 98.33 टक्के -एस.एल.देसाई विद्यालय पाट या प्रशालेचा निकाल 98.33 लागला. 120 पैकी 118 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. प्रशालेत प्रथम क्रमांक कु. यश प्रशांत चव्हाण ९७ टक्के, द्वितीय क्रमांक कु. प्रज्योत विजय मेस्त्री ९६.२० टक्के, व तृतीय क्रमांक कु. जयवंत सुधीर कुडव. ९५.४० टक्के. तसेच एकूण विद्यार्थ्यांपैकी १५ विद्यार्थी हे ९० टकाके पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण झाले आहेत. नर्मदाबाई अनंत शिवाजी देसाई विद्यालय वालावल या प्रशालेचा इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला.विद्यालयातून प्रथम क्रमांक लक्ष्मी विनायक चव्हाण ९३.४० टक्के, द्वितीय क्रमांक धनश्री विष्णू भगत ८७.४० टक्के, तृतीय क्रमांक सूरज राजेंद्र मेस्त्री ८१.६० टक्के यांनी प्राप्त केला. शिवाजी विद्यालय हिर्लोक हायस्कूलचा दहावीचा निकाल 100 टक्के लागला. 59 पैकी सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले. प्रथम क्रमांक आर्यन श्रीकृष्ण घाडीगावकर 92.20 टक्के, द्वितीय क्रमांक गार्गी रविंद्र सावंत 91.20 टक्के, तृतीय क्रमांक सिद्धेश सुधाकर नाईक 88.80 टक्के.,सरंबळ इंग्लिश स्कूल सरंबळ या प्रशालेचा दहावीचा निकाल 100 टक्के लागला. प्रथम क्रमांक मयुरी रविंद्र जाडे 96 टक्के, द्वितीय क्रमांक अथर्व सुनिल परब 92.40 टक्के, तृतीय क्रमांक आर्या जयप्रकाश गावडे 91.80 टक्के. कडावल पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सह्याद्री माध्यमिक विद्यालय भडगांव बुद्रुक या प्रशालेतून दहावी परीक्षेसाठी 26 विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. पैकी सर्व विद्यार्थी उत्तीर्ण होऊन प्रशालेचा निकाल 100 टक्के लागला. प्रथम क्रमांक समृद्धी समीर वालावलकर 94.60 टक्के, द्वितीय क्रमांक शरण्या किशोर सावंत 93.40 टक्के, तृतीय क्रमांक आर्या अमित कल्याणकर, चतुर्थ क्रमांक साहिल संदीप राणे 92.20 टक्के, पाचवा क्रमांक अलका आनंद लोट 90 टक्के , डिगस माध्यमिक विद्यालय डिगस या प्रशालेतून 12 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. पैकी सर्व विद्यार्थी उत्तीर्ण होऊन निकाल 100 टक्के एवढा लागला. प्रथम क्रमांक वैभवी संतोष पवार 88.20 टक्के, द्वितीय क्रमांक साक्षी अनंत सावंत 84.20 टक्के, तृतीय क्रमांक विश्वास रमेश आंगणे 81.40 टक्के.रामेश्वर माध्यमिक विद्यालय बांव या प्रशालेतून दहावी परीक्षेला 22 विद्यार्थी बसले होते. सर्व विद्यार्थी उत्तीर्ण होऊन प्रशालेचा निकाल 100 टक्के लागला. प्रथम क्रमांक समिधा संजय कोचरेकर 88.40 टक्के, द्वितीय क्रमांक दिया हरिश्चंद्र परब 86 टक्के, तृतीय क्रमांक पूर्वा प्रसाद सावंत 85 टक्के. म.गांधी लोकसेवा संघ पुणे संचलित बॅ.नाथ पै विद्यालय कुडाळ या प्रशालेचा दहावीचा निकाल 100 टक्के एवढा लागला. प्रथम क्रमांक युवराज गुरुप्रसाद आजगावकर 96.60 टक्के, द्वितीय क्रमांक चिन्मय समिल वारंग 94.80 टक्के, तृतीय क्रमांक 94.20 टक्के. ओरोस डॉन बोस्को हायस्कूल या प्रशालेचा दहावीचा निकाल १०० टक्के लागला. या विद्यालयाने गेली 23 वर्षे सतत १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे . एकूण विद्यार्थी 94 प्रविष्ठ झाले होते. प्रथम क्रमांक पारस विद्याधर बांदेलकर 98.60 टक्के, द्वितीय क्रमांक गार्गी निरंजन नारकर 98.20 टक्के व आर्या भालचंद्र बागवे गुण 98.20 टक्के, तृतीय क्रमांक अनुश्री मकरंद परुळेकर एकूण 97.80 टक्के. 90 टक्केच्या वर एकूण 29 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. शिवराज मराठा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय ,साळगाव एकुण निकाल 97.22 लागला असून प्रथम क्रमांक. नेहा सावळाराम माणगावकर 97.60 टक्के, द्वितीय क्रमांक साहिल गुरुनाथ टिळवे 95.20 टक्के, तृतीय क्रमांक..तन्मय गंगाराम सावंत 94.60 टक्के यांनी मिळवला आहे. न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय,कसाल एकुण निकाल 98.27 टक्के लागला असून प्रथम क्रमांक..दुर्वा दशरथ सावंत 97.60 टक्के, द्वितीय क्रमांक रिया प्रमोद पुजारे 93 टक्के, तृतीय क्रमांक नंदा नारायण सावंत 91.40 टक्के गुण मिळवले आहेत. माध्यमिक विद्यालय नेरूर -माड्याचीवाडी एकूण निकाल 100 टक्के लागला असून प्रथम क्रमांक विनोद मुकुंद राऊळ 92.60 टक्के, द्वितीय क्रमांक महादेवराज रामकृष्ण गडकरी 91 टक्के, द्वितीय क्रमांक..प्रतीक मंगेश गावडे 91 टक्के, तृतीय क्रमांक हर्षद विजय लोहार 90.20 टक्के गुण मिळवले आहेत आवळेगाव हायस्कूल आवळेगाव व कला वाणिज्य उच्च माध्यमिक विद्यालय ,आवळेगाव निकाल 100 टक्के लागला असून प्रथम क्रमांक नयन विश्वनाथ सावंत 84.40 टक्के, द्वितीय क्रमांक यशस्वी सुधीर सावंत 77.80 टक्के, तृतीय क्रमांक रिया संतोष दळवी 79.60 टक्के गुण मिळवले आहेत,एस ,एल,देसाई विद्यालय ,पाट चा एकूण निकाल 98.33 टक्के लागला असून प्रथम क्रमांक यश प्रशांत चव्हाण
97 टक्के, द्वितीय क्रमांक प्रज्योत विजय मेस्त्री 96.20 टक्के, तृतीय क्रमांक जयवंत सुधीर कुडव 95.40 टक्के गुण मिळवले आहेत. न्यू इंग्लिश स्कूल ओरोस बुद्रुक एकूण निकाल 100 टक्के लागला असून प्रथम क्रमांक नीलिमा तानाजी परब 91.80 टक्के, द्वितीय क्रमांक अंकिता साजम 86.20 टक्के, तृतीय क्रमांक..सेजल संजय गवस 86 टक्के, तृतीय क्रमांक आर्या नारायण कशाळीकर 86 टक्के गुण मिळवले आहेत. श्री कलेश्वर विद्यामंदिर ,नेरूर एकूण निकाल 100 टक्के लागला असून प्रथम क्रमांक..वैभवी सूर्यकांत घाडी 94.20 टक्के, द्वितीय क्रमांक दिनार राजन मेस्त्री 85 टक्के, तृतीय क्रमांक सानिया संतोष माने 83.80 टक्के गुण मिळवले आहेत. जयप्रकाश नारायण माध्यमिक विद्यालय,वाडोस एकूण निकाल 99 टक्के लागला असून प्रथम क्रमांक.. यज्ञा संतोष सावंत 92.60 टक्के द्वितीय क्रमांक श्रुतिका नामदेव जानकर 88.60 टक्के, तृतीय क्रमांक साक्षी सत्यवान म्हाडगुत 86.40 टक्के. गुण मिळवले आहेत. श्री भगवती देवी माध्यमिक विद्यालय,आंब्रड एकूण निकाल 100 टक्के लागला असून प्रथम क्रमांक दिव्या दत्ताराम राऊळ 93.20 टक्के, द्वितीय क्रमांक मृण्मयी विपीन भोगटे 91.20 टक्के, तृतीय क्रमांक वैष्णवी रामकृष्ण राऊळ 86.40 टक्के गुण मिळवले आहेत. लक्ष्मीनारायण विद्यालय , बिबवणे एकूण निकाल 100 टक्के लागला असून प्रथम क्रमांक वरद संदेश प्रभू 92 टक्के, द्वितीय क्रमांक श्रेया शंकर चव्हाण 91.60 टक्के, तृतीय क्रमांक अंतरा दत्तप्रसाद खानोलकर 90.60 टक्के गुण मिळवले आहेत. श्री . वा. स. विद्यालय, माणगाव एकूण निकाल 98.38 टक्के प्रथम क्रमांक सुप्रिया सुनील सरप 98 टक्के, द्वितीय क्रमांक हर्षल जयंत कुबल 97.60 टक्के, तृतीय क्रमांक वेदिका विद्यानंद पिळणकर 96.80 टक्के, गुण मिळवले आहेत. : परशुराम नाईक मास्तर हायस्कूल (तेंडोली ) चा दहावी परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला. विद्यालयातून वीस विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. पैकी सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले.यात प्रथम क्रमांक प्रिया सुभाष तेंडोलकर 91.60 टक्के, द्वितीय साक्षी शांताराम परब 88.40 टक्के, तृतीय लतिका सूर्यकांत पाटकर 87.60 टक्के गुण मिळविले. वसोली येथील को. ए. सो. यशवंत रा. परब विद्यालयाचा एस. एस. सी. परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला असून विद्यालयात प्रथम क्रमांक श्रध्दा राजेंद्र घाडी ८६.२० टक्के द्वीतीय- प्रज्वली सुरेश गुरव ८६.०० टक्के, तृतीय- प्रमिली सुरेश गुरव ८२.८० टक्के गुण. श्री देवी माऊली माध्यमिक विद्यालय चेंदवण चा दहावीचा निकाल 100 टक्के लागला असून प्रथम क्रमांक कु.निखिल मिलिंद चव्हाण हा 90. 60 टक्के गुण, द्वितीय कु.हर्षदा संजय ठुंबरे 85. 60 टक्के तृतीय कु.कीर्ती मनीज बर्वे 84. 80 टक्के गुण मिळवले आहेत. या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे प्रशालेचे संस्था अध्यक्ष , संस्था पदाधिकारी, मुख्याध्यापक उप मुख्याध्यापक , शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.