
सिंधुदुर्गनगरी : महाराष्ट्र बोर्डाच्या बारावी परीक्षा २०२४ चा ऑनलाईन निकाल सोमवारी जाहिर झाला. यामध्ये कुडाळ तालुक्याचा बारावीचा निकाल ९८.९० टक्के लागला आहे. यामध्ये प्रथम आयुष्यी रुपेश भोगटे,वाणीज्य शाखा (९५.१७ टक्के), द्वितीय चैत्राली राजे डॉन बॉस्को, ओरोस (९५ टक्के) , तृतीय पूनम चंद्रशेखर पुनाळेकर (९३.६७ टक्के), व हर्षदा दत्तदास सामंत (९३.६७ टक्के) यांनी क्रमांक पटकावला.
कुडाळ तालुक्यातून एकुण १ हजार ६४३ विद्यार्थी या परीक्षेसाठी बसले होते.पैकी १ हजार ६२५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये १६० विशेष श्रेणीत, प्रथम श्रेणीत ५३४ तर द्वितीय श्रेणीत ८०७ विद्यार्थी पास झाले आहेत. तालुक्यात १३ शाळांचा निकाल १०० टक्के लागला.
कुडाळ हायस्कूल ज्यु.कॉलेज निकाल ९९.०२ टक्के
कुडाळ हायस्कूल ज्यु.कॉलेजमध्ये ५१२ विद्यार्थी परीक्षेला बसले होते, त्यातील ५०७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विज्ञान विभाग प्रथम क्रमांक शांभवी महेंद्र परब ८७.५० टक्के, द्वितीय क्रमांक चैताली सुनिल नवार ८५.५० टक्के, तृतीय क्रमांक जयेश संदीप प्रभू ७४ टक्के मिळवून यश प्राप्त केले.वाणिज्य विभाग- प्रथम क्रमांक आयुषी रुपेश भोगटे ९५.१७ , द्वितीय क्रमांक पूनम चंद्रशेखर पुनाळेकर ९३.६७, द्वितीय हर्षदा दत्तदास सामंत ९३.६७ , तृतीय सलोनी आत्माराम तेली ९१.३३ टक्के मिळवून यश प्राप्त केले.कला विभाग-प्रथम कशीष दत्तप्रसाद खडपकर ८०.५०, द्वितीय अपूर्वा रवींद्र देसाई
७६.८३. तृतीय निलाक्षि सुभाष साळुंके ७६.६७ टक्के मिळविले. व्होकेशनल विभाग-प्रथम जान्हवी अजित वालावलकर ८१.८३ टक्के, द्वितीय गौरव संतोष नाईक ७६.८३, तृतीय पूर्वा भगवान कुंभार ७३.६७ टक्के मिळविले.
दादासाहेब तिरोडकर कनिष्ठ महाविद्यालय ,पणदूरतिठा
कला विभाग निकाल १०० टक्के
प्रथम क्रमांक प्रियांका प्रकाश कोकरे ८८.१७ टक्के , द्वितीय क्रमांक युगा सचिन तेली ७८.६७: टक्के तृतीय क्रमांक अक्षय शिवराम गोसावी ७७.६७ टक्के, विज्ञान विभाग- निकाल १०० टक्के, प्रथम क्रमांक पराग रामदास परब ८८.१७ टक्के, द्वितीय क्रमांक विनायक शशिकांत केसरकर ८२.८३ टक्के , तृतीय सेजल सतीश सुर्वे ७९.१७ टक्के, वाणिज्य विभाग- निकाल १०० टक्के
प्रथम क्रमांक मिहीर योगेश धामपूरकर ७५.८३ टक्के द्वितीय क्रमांक रितेश लक्ष्मण सावंत ७४ टक्के,तृतीय क्रमांक शंकर सीताराम मळगावकर ७३.६७ टक्के.