कुडाळ महिला तालुकाप्रमुखपदी दीक्षा सावंत, तालुकाप्रमुखपदी अरविंद करलकर

Edited by: प्रसाद पाताडे
Published on: January 30, 2024 08:17 AM
views 197  views

कुडाळ : लोकसभा व विधानसभेच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाच्या महिला तालुकाप्रमुख, व तालुकाप्रमुख पदाची नियुक्ती आज जाहीर करण्यात आली, कुडाळ महिला तालुकाप्रमुख पदी दीक्षा सावंत तर कुडाळ तालुका प्रमुख पदी अरविंद करलकर यांची नियुक्ती आज महिला जिल्हाप्रमुख वर्षा कुडाळकर, संघटक रुपेश पावसकर यांच्या उपस्थितीत या नियुक्त्या जाहीर करण्यात आली. 


मात्र या नियुक्तीच्या दरम्यान तालुकाप्रमुख बंटी तुळसकर, महिला तालुकाप्रमुख सिद्धेश्वर साठे यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय बनला असून, कुडाळ शिवसेना शिंदे गटात नाराजीचे चित्र पुन्हा एकदा पाहायला मिळाले आहे, तर नाराज शिवसेना शिंदे गटाचे काही पदाधिकारी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या रामटेक निवासस्थानी दाखल झाल्याची ही माहिती समोर येत आहे. यामुळे पुन्हा एकदा कुडाळ तालुका शिवसेना शिंदे गटातील नाराजी चव्हाट्यावर आली आहे.