कुडाळ पं. स. च्यावतीने कृषी दिन

Edited by: निलेश ओरोसकर
Published on: July 01, 2025 20:55 PM
views 9  views

कुडाळ :  'शेतकऱ्यांचा जाणता राजा', 'हरितयोद्धा' म्हणून ओळखले जाणारे वसंतराव नाईक पंचायत राज तसेच श्वेतक्रांती व रोजगार हमी योजनेचे जनक मानले जातात. त्यांच्या 112 व्या जयंती निमित्त ग्रामपंचायत वर्दे येथे कृषी दिन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

सचिन चोरगे सचिव ऍग्री कार्ट एफ पी ओ कुडाळ, विजय दळवी सहयोगी अधिष्ठाता, शरद नाईक कृषी तज्ञ, बाळकृष्ण परब समाजकल्याण अधिकारी, प्रफुल्ल वालावलकर गटविकास अधिकारी कुडाळ इतर मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात पूर्ण प्राथमिक शाळा वर्दे च्या मुलांनी दिंडी काढून केली. प्रगतशील शेतकऱ्यांचा या वेळी सत्कार करण्यात आला. रामचंद्र केसरकर माणगाव भात पीक,आनंद सावंत आम्रड, संतोष गावडे रानबांबूळी यांचा तालुका प्रगतशील शेतकरी म्हणून गौरव करण्यात आला. शेती क्षेत्रात प्रगती व्हावी त्यातून चांगले उत्पादन व्हावे यासाठी झटणाऱ्या शासकीय कर्मचारी यांचा ही सत्कार करण्यात आला.