कुडाळ न.पं. मालकीच्या खुल्या क्षेत्रातील जागांची मोजणी करा

विलास कुडाळकर यांची मागणी
Edited by: प्रसाद पाताडे
Published on: September 15, 2023 14:46 PM
views 96  views

कुडाळ : कुडाळ नगरपंचायत मालकीच्या खुल्या क्षेत्रातील जागांची मोजणी करा तसेच प्रामुख्याने गांधी चौक ते भाट दुकान व गांधी चौक ते गुलमोहर हॉटेल या रस्त्याची ही मोजणी करा अशी मागणी कुडाळ नगरपंचायत च्या सर्वसाधारण सभेत गटनेते विलास कुडाळकर यांनी केली. याला सर्व नगरसेवकांनी सहमती दर्शवली.

कुडाळ नगरपंचायत सर्वसाधारण सभा शुक्रवारी नगराध्यक्ष अक्षता खटावकर यांच्या अध्यक्षतेखाली नगराध्यक्ष दालनात पार पडली या सभेला उपनगराध्यक्ष किरण शिंदे, भाजप गटनेते विलास कुडाळकर, आरोग्य सभापती श्रुती वर्दम,बांधकाम ज्योती जळवी काँग्रेसच्या महिला व बालकल्याण सभापती आफरीन करोल,, उभाठा गट नगरसेवक मंदार शिरसाट, उदय मांजरेकर, सई काळप, भाजप नगरसेवक राजू कुडाळकर, अनिल परब गणेश बोगटे, चांदणी कांबळी,प्राजक्ता बांदेकर  आदी उपस्थित होते