SSC RESULT 2023 ; कुडाळ हायस्कूलचा निकाल 96.24 टक्के

Edited by: भरत केसरकर
Published on: June 02, 2023 17:21 PM
views 196  views

कुडाळ : कुडाळ हायस्कूल कुडाळ या प्रशालेतील इयत्ता दहावीतील 213 पैकी 205 विद्यार्थी उत्तीर्ण होऊन प्रशालेचा निकाल 96.24 टक्के लागला. या परीक्षेत प्रथम क्रमांक राधिका तेरसे 98.20 टक्के व वरद माईनकर 98.20 टक्के, द्वितीय क्र. अन्वय पाटकर 97 टक्के. तृतीय क्र. युतिका  पालव 96.80 टक्के यांनी मिळविला.

या प्रशालेचे 90 टक्केच्या वरील 23 विद्यार्थी आहेत तर संस्कृत विषयांमध्ये शंभर पैकी शंभर मिळवणारे सात विद्यार्थी आहेत.