जालना प्रकरणाचा कुडाळ कॉंग्रेसने केला निषेध

Edited by: प्रसाद पाताडे
Published on: September 02, 2023 20:04 PM
views 316  views

कुडाळ : जालना अंबड येथे मराठा समाज आपल्या न्याय मागण्यासाठी उपोषण करत होते. यावेळी उपोषणकर्त्यांवर  पोलिसांनी अमानुषपणे लाठीचार्ज करून हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला. त्या विरोधात कुडाळ तालुका काँग्रेसच्या वतीने आज गांधी चौक कुडाळ येथे काळे झेंडे दाखवून शिंदे फडणवीस पवार महायुती सरकारचा निषेध करण्यात आला. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. 

यावेळी कुडाळ काँग्रेस तालुकाध्यक्ष अभय शिरसाट, काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष विजय प्रभू , कुडाळ नगरपंचायत उप नगराध्यक्ष किरण शिंदे, नगरसेविका आफरीन करोल , युवक विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष मंदार शिरसाट, सुंदर सावंत, उल्हास शिरसाट, तबरेज शेख, तौसिफ शेख, बाळा राऊळ, चिन्मय बांदेकर, वैभव आजगावकर, रोहन काणेकर, अनंत खटावकर आदी उपस्थित होते.